महाराष्ट्र हे फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेचे मॉडेल - कन्हेय्या कुमार (Maharashtra is the model of Phule-Shahu-Ambedkar ideology - Kanheiya Kumar)

Vidyanshnewslive
By -
0
महाराष्ट्र हे फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेचे मॉडेल - कन्हेय्या कुमार (Maharashtra is the model of Phule-Shahu-Ambedkar ideology - Kanheiya Kumar)

बल्लारपूर :- 2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही लक्षवेधी ठरणार असून या निवडणुकी कडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेले असून महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचे मॉडेल असल्याचे मत नवी दिल्लीच्या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले कन्हेय्या कुमार यांनी व्यक्त केले. बल्लारपूर शहरातील गांधी पुतळा परिसरात आयोजित महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिहं रावत यांच्या प्रचार सभेत व्यक्त केले पुढे बोलतांना ते म्हणाले की मूर्त व्यक्तींच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यापेक्षा अमूर्त वस्तूना उध्वस्त करून पुनरनिर्माण करणे म्हणजे विकास होय का असा प्रतिप्रश्न ही विचारला आम्ही धर्माला जरी पूजत असलो तरी लोकशाही व संविधान या समता, स्वातंत्र्य बंधुता या तत्वाचंही पालन करतो म्हणून आपण सर्व मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणून पुरोगामी विचारांना बळकट करण्याचं आवाहन सुध्दा कन्हेय्या कुमार यांनी केले.

 
         बल्लारपूर येथील या प्रचार सभेला बाबासाहेब वासाडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, संतोषसिह रावत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैदय, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे, आम आदमी पक्षाचे रवी पुप्पलवार, रिपब्लिकन नेते अशोक निमगडे, पवन भगत, प्रदीप गेडाम माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, दिलीप माकोडे, बल्लारपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष करीम भाई, नरेश मुंदळा, यांच्या सह महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या नेत्यांची मंचावर उपस्थिती होती. या सभेचे संचालन देवेंद्र आर्य यांनी तर आभार प्रदर्शन एड. पवन मेश्राम यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)