महायुतीला सत्तेतून पायउतार करा, विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे बल्लारपूरात आवाहन (Get the Grand Alliance out of power, Leader of Opposition MLA Vijay Wadettiwar appeals in Ballarpur)
बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्हयात एकही उद्योग आणला नाही, उलट येथे सुरु असलेले उद्योग बंद पाडले. येथील नागरिक रोजगारासाठी वणवण भटकत आहे. काहींना तर नोकरीसाठी तेलंगण राज्यात जावे लागते. सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव के. राजू, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, जिल्हा बँक अध्यक्ष आणि बल्लारपूर-मूल विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत, माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) संदीप गिऱ्हे, डॉ. संजय घाटे, घनश्याम मुलचंदनी, डॉ. वाढई, दिलीप माकोडे, सिक्की यादव, रोशनलाल बिट्टू, गोविंद उपरे, करीमभाई शेख,राजू काबरा, बादल उराडे, मल्लेश्र्वरी महेशकर, याकूब पठाण, डॉ. बावणे, डॉ.कुलदीवार व अन्य उपस्थित होते. जयभीम चौक विजयस्तंभ परिसर आणि दुर्गापूर येथे आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत यांच्यासाठी घेतलेल्या सभेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, भाजप खोटारड्यांचा पक्ष आहे.
महायुतीला महाराष्ट्राच्या सत्तेतून पायउतार करण्याची वेळ आली आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बल्लारपूर येथे आयोजित महाविकास आघडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या प्रचार सभेत सांगितले. काँग्रेस कमिटी सचिव के. राजू म्हणाले की, काँग्रेसने पाच गॅरंटी दिल्या आहेत. त्या फक्त निवडणुकीसाठी देण्यात आलेली आश्वासने नाहीत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत आल्यास महिलांना तीन हजार रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तेलंगणात बहिणींसाठी प्रतिमाह २ हजार ५०० रुपयांची योजना बंद केल्याचे धादांत खोटे भाजप पसरवत आहे. तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यात योजना अजूनही सुरु आहे. राज्याचा विकास केला म्हणता मग रोजगारासाठी येथील कामगार परराज्यात का जातात? असा सवाल त्यांनी केला. प्रदेश उपाध्यक्ष किशोर कन्हेरे यांनी भाजप उमेदवार मुनगंटीवार यांच्याकडून होत असलेल्या विकास कामांच्या दाव्याचा समाचार घेतला. आघाडीचे उमेदवार रावत यांनी ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन ऍड मेघा भाले, प्रास्ताविक घनश्याम मुलचंदानी यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments