चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मधील नोकर भरती संबंधाने आचारसहिंता भंग केल्या प्रकरणी मनसेची निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार (Complaint of MNS to election officer regarding violation of code of conduct in Chandrapur District Central Cooperative Bank.)
चंद्रपूर :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक नोकर भरतीत एससी एसटी ओबीसी, विमुक्त भटक्या जमाती यांचे आरक्षण रद्द करून व आचारसहिंता काळात बैंकेच्या अध्यक्ष पदाचा दुरुपयोग करत नियमबाह्य निर्णय घेऊन आचारसहिंतेचा भंग केल्याने संतोष रावत यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा सहाय्य्क निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे, यावेळी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार तथा जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या देखरेखित नोकर भरती प्रक्रिया ऐन निवडणूकीच्या काळात होत असून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 ला विधानसभा निवडणूकीची आचारसहिंता जाहीर झाली असतांना व नोकर भरतीत दिलेल्या जाहिरातीनुसार ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुद्दत 19 ऑक्टोबर असतांना ती मुद्दत आचारसहिंता काळात अध्यक्ष यांनी 22 ऑक्टोबर ला रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढवली व परीक्षा फी करिता ती मुद्दत 25 ऑक्टोबर पर्यंत केली, दरम्यान जाहिरात मध्ये सुद्धा बदल करण्यात आला होता, खरं तर सर्वोच्य न्यायालयाने जो आदेश दिला होता की सरकारी, निमसरकारी किंव्हा संस्थेच्या नोकर भरती प्रक्रियेच्या सुरुवातीला जी जाहिरात प्रसिद्ध होते त्यानुसारचं भरती प्रक्रिया राबवावी त्यात बदल करता येणार नाही, पण बैंक व्यवस्थापनाने फॉर्म भरण्याच्या मुदतीत व जाहिरातीत बदल करून सर्वोच्य न्यायालयाचा अवमान केला आहे व आचारसहिंता काळात स्वतः बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत हे अध्यक्ष असतांना आणि कांग्रेस चे विधानसभा निवडणुकीत ते निवडणूक लढत असतांना त्यांनी केलेले बदल हे आचारसहिंतेचे उल्लंघन आहे. संतोष रावत यांनी शासनाचा कुठंलाही निर्णय किंव्हा आदेश नसताना व कुठल्याही न्यायालयात बैंकेतील आरक्षण रद्द केल्याचा निर्णय नसताना, शिवाय याचं जिल्हा बैंकेत 7/09/2014 ला झालेल्या नोकर भरतीत आरक्षण लागू केले असतांना मागासवर्गी्यांचे (एससी, एसटी, ओबीसी, विमुक्त भटक्या जमाती यांचे ) आरक्षण रद्द करून शासनाच्या 25 फेब्रुवारी 2022 शासन निर्णयाला केळाची टोपली दाखवली आहे, ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज दिनांक 29/10/2024 ला भरल्यानंतर 30/10/2024 ला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व गट सचिव व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे व्यवस्थापक कार्यालयीन नियमित व कंत्राटी कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देऊन आदर्श आचारसहिंतेचा भंग केला आहे, त्यामुळे आदर्श आचारसहिंता पालन न करणाऱ्या व आपल्या पदाचा दुरुपयोग करून नियमबाह्य निर्णय घेणाऱ्या कांग्रेस उमेदवार संतोष रावत यांच्यावर आचारसहिंता भंग केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा अशी मागणी मनसे तर्फे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांच्यासह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments