पोंभुर्णा :- जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. पोंभुर्णा तालुक्यातील चेकआष्टा येथे आदिवासी बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, ‘आदिवासी आणि अनुसूचित जातीतील बंधू-भगिनी अजूनही मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. त्यांना जीवनातील अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या सहा मूलभूत गरजापासूनही उपेक्षित आहे , त्या सर्वांच्या कल्याणासाठी, विकासासाठी आणि प्रगतीसाठी सर्व शक्तीनिशी उभा राहील.’ चेकआष्टा गावातील विविध विकासकामांसाठी तसेच पाणंद रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. येथील आदिवासी बांधवांच्या मागणीनुसार, माता मंदिराचे नूतनीकरण, पाणंद रस्त्याचे डांबरीकरण तसेच सामाजिक सभागृहासमोरील परिसरात पेव्हिंग ब्लॉक लावून देण्यात येतील. या गावाच्या विकास कामांसाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण व्हावे ही भावना मनात ठेवून कार्य करण्यात येत आहे. जेवढी कामे या मतदारसंघात तसेच जिल्ह्यात केली महाराष्ट्रात कोणत्याही विधानसभेत इतकी विकासकामे झालेली नाही, याचा अभिमान असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments