चंद्रपूरात ओबीसी संवाद कार्यक्रम संपन्नओबीसींचा एल्गार; राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या पाठीशी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराज अहीर (OBC dialogue program concluded in Chandrapur Elgar of OBCs; Backed by the National Commission for Backward Classes, the National Commission for Backward Classes will protect the rights and entitlements of the Backward Classes: National Commission for Backward Classes Chairman Hon. Hansraj Ahir)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरात ओबीसी संवाद कार्यक्रम संपन्न ओबीसींचा एल्गार; राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या पाठीशी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराज अहीर (OBC dialogue program concluded in Chandrapur Elgar of OBCs; Backed by the National Commission for Backward Classes, the National Commission for Backward Classes will protect the rights and entitlements of the Backward Classes: National Commission for Backward Classes Chairman Hon. Hansraj Ahir)


चंद्रपूर :- यापुढे ओबीसी आरक्षणाबाबत कोणतेही घोटाळे होणार नाही. Certainly मागासवर्गीय आयोगाचा प्रभाव व दबाव आता वाढलेला आहे. आयोग ओबीसीबाबत होणाऱ्या सर्व घोटाळ्यावर अंकुश ठेवून आहे. तसे अहवाल तयार करण्यात येत आहेत. शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती पासून तर नोकर भरती इथपर्यंत आता आयोग लक्ष ठेवून आहे. काही राज्यात होणारे घोटाळे आयोगाने उघडकीस आणले आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल, अशी ग्वाही भारत सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी यावेळी आयोजित संवाद कार्यक्रमात दिली. पं. बंगाल, कर्नाटक व इतर राज्यांनी ओबीसी आरक्षणात केलेले घोटाळे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून उघड झाले आहे. त्यासंबंधी ओबीसी संघटनांसोबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा ओबीसी संवाद कार्यक्रम काल शनिवार दि. 01 जुन, 2024 रोजी स्थानिक जनता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मधे पार पडला. यावेळी अध्यक्ष स्थानी डॉ. अशोक जीवतोडे उपस्थित होते. मंचावर प्रमुख अतिथी स्वरूपात ओबीसी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बबनराव फंड, बबनराव वानखेडे, ज्येष्ठ विधीज्ञ पुरुषोत्तम सातपुते, माजी आमदार अड. संजय धोटे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन कुकडे, ओबीसी मोर्चाचे विनोद शेरकी आदी उपस्थित होते. या ओबीसी संवाद कार्यक्रमात पूर्व विदर्भातून ओबीसीतील विविध जात समुदायातील पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संवाद कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तरे घेण्यात आली. उपस्थित ओबीसी बांधवांनी हंसराज अहीर यांना प्रश्न विचारली, त्या प्रश्नांची यथोचीत उत्तरे देण्याचा प्रयत्न केल्या गेला. या निमित्ताने काही जात संघटनांनी आयोगाच्या अध्यक्षांना निवेदन दिले. कार्यक्रमाला खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, रघुवीर अहीर, राजु घरोटे, किसनराव गरपल्लीवार, जयजगन्नाथ जंपलवार, विजुभाऊ मुंगले, भुजंग ढोले, राजू बोलमवार, राहुल देवतळे, संजय मिसलवार, सुदामा यादव, मयूर भोकरे, वंदना संतोषवार, मुग्धा खांडे, अरुणा चौधरी, सारिका संदुरकर, कल्पना बगुलकर, विनोद खेवले, मधुरक राऊत, प्रदिप किरमे, शालु कन्नोजवार, अड हरीश मंचलवार, सुभाष आदमने, देवानंद वाढई, संजय खनके, श्रीकांत भोयर, प्रमोद शास्त्रकार, अरुण. ई ची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)