बल्लारपूरातील गोल पुलातील काम संथगतीने, नागरिकांना करावा लागतोय अडचणीचा सामना - भारतीय जनता पक्षाचा पत्रकार परिषदेतून आरोप (Ballarpur goal bridge work is slow, citizens have to face difficulties - Bharatiya Janata Party's press conference alleges)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरातील गोल पुलातील काम संथगतीने, नागरिकांना करावा लागतोय अडचणीचा सामना - भारतीय जनता पक्षाचा पत्रकार परिषदेतून आरोप (Ballarpur goal bridge work is slow, citizens have to face difficulties - Bharatiya Janata Party's press conference alleges)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील बस्ती विभाग व टेकडी विभाग यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा गोल पूल दैनंदिन कार्यकारिता सुरु करण्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा. बल्लारपूर शहरातील वस्ती विभाग व डब्ल्यू.सी.एल. बल्लारपूर शहरातील निम्मी लोकसंख्या वस्ती विभागात राहते. वस्ती व ​​शहराला जोडणारा गोल पुलाखालील एकमेव मार्ग असून यामुळे नागरिकांना तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, बसस्थानक, बाजारपेठ, ग्रामीण रुग्णालय, पाणीपुरवठा कार्यालय, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन आदी कामांसाठी उपलब्ध आहे. मात्र रेल्वेच्या तिसऱ्या मार्गीकेच्या विस्तारी करणाच्या कामांमुळे हा मार्ग वारंवार ठप्प होत आहे. पाच मिनिटे जरी पाऊस आला तरी या पावसामुळे हा मार्ग बंद होत असतो. या समस्येमुळे प्रशासनाला वारंवार तोंडी कळवूनही प्रशासन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे या वस्ती विभागात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पावसामुळे हा मार्ग सुरू बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य समजून प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. जेणेकरून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांपासून दिलासा मिळू शकेल. अन्यथा नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाला घटनात्मक आधारावर प्रशासनाच्या विरोधात मैदानात उतरावे लागेल. आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली विश्वसनीय सूत्रानुसार या संदर्भात माहिती मिळाली की गोल पुलातील पाण्याच्या निचरा होण्याच्या समस्यावर तात्पुरत्या स्वरूपात तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, तालुकाध्यक्ष काशिनाथ सिहं, जिल्हा महामंत्री मनीष पांडे, निलेश खरबडे, आशिष देवतले, वैशाली जोशी, स्वामी रायबरम ई ची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)