चंद्रपूरात भरदिवसा गोळीबाराचा थरार, मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार, आरोपी फरार Thrill of firing in broad daylight in Chandrapur, firing on district president of MNS Kamgar Sena, accused absconding)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरात भरदिवसा गोळीबाराचा थरार, मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार, आरोपी फरार Thrill of firing in broad daylight in Chandrapur, firing on district president of MNS Kamgar Sena, accused absconding)


चंद्रपूर :- शहरातील मध्यभागी असणाऱ्या आझाद बगीचा जवळील रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये जुन्या वैमनस्यातून मनसेचे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर जवळपास दुपारी 2.00 च्या दरम्यान अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली असून गोळीबार झाल्यानंतर आरोपी फरार झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीसांची ची चमू घटनास्थळी दाखल झाली व अमन अंदेवार यांना प्राथमिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर नागपूर ला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान या गोळीबार प्रकरणाने शहरात दहशत पसरली आहे. दरम्यान हत्येच्या काही दिवसांपूर्वी आरोपी अमन अंदेवार याने व्हाट्सएप स्टेटसवर ‘जंगल जंगल ही रहेगा, मगर शेर बदल जायेगा’ अशी पोस्ट टाकली होती त्यामुळे सुरज बहुरिया यांचा सुनियोजित कट होता हे स्पष्ट होते, या घटनेनंतर सुरज बहुरिया गैगने अमन अंदेवार यांना ठार करण्याचा मनसूबा जाहीर करून खुलं आव्हान केलं असल्याची चर्चा आहे, हा वचपा काढण्यासाठी मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी याचं सुरज बहुरिया समर्थकांनी अमन अंदेवार यांचे बंधू आकाश उर्फ चिन्ना अंदेवार यांच्यावर याचं रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये गोळीबार केला होता आणि आता त्याची पुन्हा पुनरावृत्ती झाली असून आता अमन अंदेवार यांच्यावर गोळीबार झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण आहे. मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर झालेल्या गोळीवर प्रकरणाला मागील सन 2020 मध्ये बल्लारपूर येथील कोळसा व्यापारी सुरज बहुरीया याची भरदिवसा भर चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती त्या घटनेशी जोडले जातं आहे, बहुरिया हत्त्या प्रकरणात अमन अंदेवार यांच्यासह त्यांचे बंधू आकाश उर्फ चिन्ना अंदेवार, आल्फ्रेड उर्फ बंटी लॉजिस्ट अँथोनी, प्रणय राजू सैगल, बादल वसंत हरणे, अविनाश उमाशंकर बोबडे सर्व राहणार बल्लारपूर यांचा समावेश होता, या हत्येला दारुतस्करी आणि कोळसा तस्करीचे कारण असल्याचे म्हटल्या जातं होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)