चंद्रपूर (मूल) :- नगर परिषदेला स्वच्छता अभियानात भरभरून मिळाले. करोडो चे पारितोषिक मिळाले. याच पैशावर ' काळी' नजर ठेवून घनकचरा व्यवस्थापनात 'खोके' कमविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मात्र ज्या सफाई कामगारांनी मूल शहराच्या घाणीत हातपाय मैले केलेत आज त्याच्या उपोषणाची दखल कुणीच घेतली नाही, मात्र नगरसेविका प्राची आक्केवार यांनी "सावित्री' ची लेक बनून उपोषण स्थळी भेट देत या क्षेत्राचे आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचेपर्यंत सफाई कामगारांच्या मागण्या पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतल्याने सफाई कामगारांच्या मागण्या मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे. 25 ऑगस्ट पासून मूल न. प. तील कंत्राटी सफाई कामगार त्रस्त होऊन आपल्या न्याय मागण्यासाठी बेमुदत उपोषणावर बसले आहेत.
या कंत्राटी सफाई कामगारांमध्ये नाली सफाई, झाडू सफाई, रस्ते सफाई, घनकचरा व्यवस्थापनात काम करणारे कामगार यांचा समावेश आहे. घनकचरा व्यवस्थापनातर्गत निविदा काढताना या निवीदेची किंमत दुप्पट करण्यात आली मात्र न. प. अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगाऱांना गत अनेक वर्षापासून वेतनवाढ देण्यात न आल्याने या कामगारांमध्ये मोठा असंतोष पसरला असल्याचे कळते. गत 19 दिवसांआधी ठेकेदार व न. प. प्रशासनास लेखी नोटीस देऊनही कुठलीही सकारात्मक चर्चा न झाल्याने या कामगारानी उपोषण सुरू केले आहे हे विशेष. कामगारांच्या मागण्या मध्ये किमान वेतन कायद्यानुसार वेतन, गत 10 सालापासून न दिलेली वेतन वाढ लागू करणे, परस्पर कामावरून कमी न करणे या सारख्या मागण्या आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरू करण्याची घोषणा होऊनही कुणीही जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांनी या कामगारांना वाऱ्यावर सोडले मात्र नगरसेविका प्राची आक्केवार यांनी उपोषण स्थळी भेट देऊन चर्चा करून या मागण्या विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे त्वरीत पाठपुरावा करून मार्ग काढण्याचे भरीव आश्वासन दिल्याने उपोषणाला बसलेल्या कंत्राटी सफाई कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत हे निश्चित. मूल न. प. अंतर्गत खूप पुरुष अधिकारी व पदाधिकारी आहेत मात्र "सावित्री" ची लेक ठरली ती प्राची आक्केवार.....!
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या