Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

राजुऱ्यात भरदिवसा गोळीबाराने खळबळ, सोमनाथपुरातील विनोद जाधव यांची दोन अज्ञात व्यक्ती कडून हत्या..! (Broad-daylight shooting causes a stir in Rajura; Vinod Jadhav from Somnathpur murdered by two unidentified individuals.)

राजुऱ्यात भरदिवसा गोळीबाराने खळबळ, सोमनाथपुरातील विनोद जाधव यांची दोन अज्ञात व्यक्ती कडून हत्या..! (Broad-daylight shooting causes a stir in Rajura; Vinod Jadhav from Somnathpur murdered by two unidentified individuals.)

राजुरा :- चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत आहे राजुरा शहरात सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली. सोमनाथपूर वॉर्डातील रहिवासी विनोद उर्फ पापा जाधव याच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात जाधव यांच्या डोक्याला गोळी लागल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून घटनेचा तपास सुरू केला आहे. गोळीबार करणारे दोन्ही संशयित घटनास्थळावरून फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशेने तपास सुरू आहे. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला की अन्य कोणत्या कारणातून, याचा तपास पोलीस करीत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या गोळीबारामुळे राजुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 
           यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा शहरातील मुख्य मार्गावर प्रदीप बिअर बारच्या बाजूला असलेल्या नारळाच्या दुकानाजवळ ही घटना घडली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारानंतर जखमी अवस्थेत असलेल्या जाधव यांना नागरिकांनी तातडीने उचलून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, घटनेनंतर दोन्ही हल्लेखोरांनी राजुरा पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. करण मेकलवार (२२) आणि दीपक बाविसकर (२४) अशी त्यांची नावे आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या