Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

धक्कादायक...! चंद्रपुरात 'बोगस पदव्यां'चा सूळसुळाट, पाच ते सहा विद्यापीठांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट उघड ५ ते १० लाखांत 'बोगस पदव्यां'चा बाजार (Shocking...! Proliferation of 'bogus degrees' in Chandrapur; racket involving fake certificates from five to six universities exposed; a market for 'bogus degrees' operating for ₹5 to ₹10 lakhs.)

धक्कादायक...! चंद्रपुरात 'बोगस पदव्यां'चा सूळसुळाट, पाच ते सहा विद्यापीठांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट उघड ५ ते १० लाखांत 'बोगस पदव्यां'चा बाजार (Shocking...! Proliferation of 'bogus degrees' in Chandrapur; racket involving fake certificates from five to six universities exposed; a market for 'bogus degrees' operating for ₹5 to ₹10 lakhs.)


चंद्रपूर :- शासकीय नोकरी, महाविद्यालयीन प्रवेश आणि विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात पदोन्नती मिळवून देण्याचे आमिष दाखवत नामांकित पाच ते सहा विद्यापीठांच्या बनावट पदव्या, गुणपत्रिका, डिप्लोमा आणि मायग्रेशन प्रमाणपत्रांची लाखो रुपयांना विक्री करणारे रॅकेट चंद्रपुरात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी वैभव सोनुले या एका आरोपीला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी तुकुम येथील परिमल बाबुराव गौरकर फरार आहे. दुर्गापूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांना विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, परिमल गौरकर याने जानेवारी २०२६ मध्ये शेजारी वैभव गणपतराव माशीरकर यांच्याकडे कारमधील एक कापडी थैली सुरक्षित ठेवण्यास दिली होती. काही प्रमाणपत्रे घेण्यासाठी तो पुन्हा माशीरकर यांच्या घरी आला असता, त्यांनी थैलीतील कागदपत्रांबाबत विचारणा केली. त्यावेळी गौरकर याने शासकीय नोकरी, महाविद्यालयीन प्रवेश अथवा पदोन्नतीसाठी आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे गरजेनुसार पाच ते दहा लाख रुपयांत तयार करून देत असल्याचे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. परिमल एकमेकांचे नातेवाईक आहेत. परिमल याचे कॅनरा, एक्सीस, एचडीफसी व अन्य अशा एकूण चार बँकांमध्ये खाती आहेत. या बँक खात्यांमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या दोन्ही आरोपींनी यानंतर थैलीची तपासणी केली असता त्यात विविध विद्यापीठांच्या नावाने तयार केलेली बनावट पदवी, गुणपत्रिका तसेच विविध प्रमाणपत्रे आढळली. त्यामध्ये नागपूरच्या इतरांच्या नावाने तीन ते चार वाहने खरेदी केली आहेत. यातील काही वाहने दुर्गापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पोलिसांनी वैभव याप्रकरणी सोनुले या आरोपीला आहे. तर मुख्य आरोपी परिमल गौरकर हा फरार आहे. 
        दरम्यान आरोपी वैभव सोनुले याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, श्रीधर युनिव्हर्सिटी (पिलानी), गोंडवाना विद्यापीठ आणि छत्रपती शाहूजी महाराज युनिव्हर्सिटी (कानपूर) यांच्यासह कर्नाटक येथील विद्यापीठाच्या नावाच्या सेमिस्टर गुणपत्रिका, डिप्लोमा आणि मायग्रेशन प्रमाणपत्रांचा समावेश आहे. या कागदपत्रांवर बनावट शिक्के व स्वाक्षऱ्या आहेत. थैली परत घेण्यासाठी गौरकर न आल्याने माशीरकर यांनी दुर्गापूर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी कागदपत्रे जप्त करून त्यांची सत्यता, निर्मितीचे ठिकाण, आर्थिक व्यवहार आणि रॅकेटमधील अन्य व्यक्तींचा सहभाग याबाबत तपास सुरू केला. या तपासात मुख्य आरोपी परिमल गौरकर याने बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे अनेकांना शासकीय नोकरी, महाविद्यालयीन प्रवेश आणि पदोन्नती मिळवून दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आरोपीने नेमक्या किती लोकांना नोकरी, पदोन्नती दिली याची माहिती पोलीस गोळा करित आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र नक्कनवार या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या