Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

धक्कादायक...! शिक्षकांनी रागावल्याच्या कारणावरून चंद्रपूरात 14 वर्षीय विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेऊन आत्महत्या (Shocking...! A 14-year-old girl in Chandrapur took the extreme step of hanging herself after being scolded by a teacher.)

धक्कादायक...! शिक्षकांनी रागावल्याच्या कारणावरून  चंद्रपूरात 14 वर्षीय विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेऊन आत्महत्या (Shocking...! A 14-year-old girl in Chandrapur took the extreme step of hanging herself after being scolded by a teacher.)

चंद्रपूर :- मुख्याध्यापकांनी रागावल्याच्या शुल्लक कारणातून चंद्रपूर शहरात नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कु. तनिष्का गाडगे वय - 14 वर्ष सदर विद्यार्थिनी ही चंद्रपूर शहरातील एका नामांकित शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शाळेच्या भिंतीवर तिने काही मजकूर लिहिल्याचे मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आले. यानंतर मुख्याध्यापकांनी याबाबत तिच्या आई-वडिलांकडे तक्रार केली. त्यानंतर आई-वडिलांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतली. मात्र, त्यानंतर घरी परतल्यानंतर काही वेळातच विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. 
         विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित प्रकरणाबाबत चर्चा झाल्यानंतर आई-वडील आणि मुलगी घरी परतल्याची माहिती आहे. त्यानंतर काही वेळाने विद्यार्थिनीचे आई-वडील वकील असल्यामुळे कामाकरिता न्यायालयात गेले होते. त्यावेळी मुलगी घरीच होती. आई-वडील घराबाहेर गेल्यानंतर विद्यार्थिनीने घरातील पंख्याला गळफास घेतल्याचे समोर आले. कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. शाळेतील घटना, मुख्याध्यापकांनी केलेली तक्रार, त्यानंतर आई-वडिलांची झालेली भेट आणि विद्यार्थिनीची मानसिक अवस्था या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. दरम्यान, अवघ्या 14 वर्षांच्या विद्यार्थिनीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळेतील किरकोळ वाटणाऱ्या प्रसंगानंतर घडलेल्या या घटनेमुळे पालक आणि शिक्षकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या