पांढर हरीण, औषधीयुक्त पिवळं परस पाठोपाठ काळ्या सोन्याच्या शहरालगत ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात काळ्या रंगाच्या बिबट्यासह त्यांची पिल्ले आढळून आली, वन्यजीव अभ्यासकांना कुतूहलाचा विषय ! (White Deer, Medicinal Yellow Pars followed by Black Leopards in Tadoba - Andhari Tiger Reserve near Black Gold City with their cubs, a subject of curiosity for wildlife enthusiasts !)
चंद्रपूर :- विविधतेने नटलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात काळा बिबट, पांढरे हरीण, गुणकारी पिवळा पळसपाठोपाठ आता ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात मादी बिबटसोबत तिचे काळ्या रंगाचे दोन पिल्लू दिसून आले आहेत. चंद्रपूर जिल्हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व 'ब्लॅक गोल्ड' अर्थात काळ्या कोळशासाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र, आता काळ्या बिबट्यापाठोपाठ पांढरे हरीण आणि पिवळे पळसही जंगलात दिसून आले आहे. आजच चिचपल्लीच्या जंगलात गुणकारी पिवळा पळस दिसून आला. त्यानंतर आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मदनापूर प्रवेश द्वारावर एक मादी बिबट तिच्या काळ्या रंगाच्या दोन पिल्लांसह जंगलात भ्रमंती करीत असल्याची चित्रफीत सार्वत्रिक झाली आहे. बिबट्याची ही काळ्या रंगाची दोन्ही पिल्ले मादी बिबट्याच्या मागे जात आहे. काळे बिबट अतिशय दुर्मिळ. ताडोबाच्या जंगलात या बिबट्याचे वास्तव्य आहे, तर एक बिबट नवेगाव-नागझिराच्या जंगलात होता. मात्र काही दिवसांपूर्वीच या बिबट्याची शिकार करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ताडोबाच्या जंगलात बिबट्याचे काळ्या रंगाचे दोन पिल्लू पर्यटकांच्या दृष्टीस पडले. वन्यजीव अभ्यासकांमध्ये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, चंद्रपुरातील काही पर्यटकांनी रविवारी ताडोबाच्या मदनापूर प्रवेशद्वाराने जंगल सफारी केली. याच पर्यटकांना बिबट्याची ही काळी पिल्लं दिसली आहे. त्यांनी मादी व बिबट्याचे चित्रीकरण केले आहे. त्यात मादी स्पष्टपणे दिसत असून तिच्या मागे तिची काळ्या रंगाची दोन पिल्लं जाताना दिसत आहे. काळ्या बिबट्यापाठोपाठ आता बिबट्याच्या काळ्या पिल्लांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पिल्लांचा रंग काळा कसा, हा अभ्यासाचा व कुतूहलाचा विषय आहे. मादी बिबट आपल्या काळ्या रंगाच्या पिल्लांसह जंगलात भ्रमंती करीत असल्याची चित्रफीत समाज माध्यमावर सार्वत्रिक झाली आहे. बिबट्याच्या काळ्या पिल्लांना पाहून वन्यजीव अभ्यासकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments