धक्कादायक ! महिला दिनीच चंद्रपुरात तरुणीची गळफास घेवून आत्महत्या (Shocking! On Women's Day, a young woman committed suicide by hanging herself in Chandrapur)
चंद्रपूर :- आज 8 मार्च जगभरात जागतिक महिला दिन साजरा होत असतांना चंद्रपुरात एक धक्कादायक घटना घडली चंद्रपुरातील घुटकाळा प्रभागात भंडारा येथून शिक्षणासाठी आलेल्या एका तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची माहीती आहे या संदर्भात सूत्रांच्या अधिक माहितीनुसार गायत्री रामटेके वय - 20 ही तरुणी उच्च शिक्षणासाठी चंद्रपुरातील घुटकाळा प्रभागात भाड्याच्या घरात वास्तव्यास होती तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली या तरुणीला आई वडील कुणीही नव्हते त्यामुळं ती स्वतःला हतबल समजत होती सदर कृत्य करतांना तरुणीने समाज माध्यमावर स्वतःचा सिंदूर असलेला फोटो पोस्ट केला तसेच पोस्ट करतांना ही माझी शेवटची पोस्ट गुड बाय असेही नमूद केले त्यामूळे सदर तरुणीने ही आत्महत्या प्रेम प्रकरणातुन तर केली नाही ना अशी शंकाकुशंका व्यक्त करण्यात येत आहे या संदर्भात पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.
Post a Comment
0Comments