बल्लारपुरात भटक्या कुत्र्याने 6 वर्षीय चिमुकलीच्या गालाचा चावा घेतला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवघड शस्त्रक्रिया पार पडली (Stray dog bites 6-year-old girl's cheek in Ballarpur, Govt Medical College undergoes difficult surgery)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील सर्वोदय विद्यालयासमोर मुरलीधर मंदिर परिसरात एका भटक्या श्वानाने सहा वर्षीय मुलीच्या गालाला चावा घेत गालाचा लचका तोडला असल्याची धक्कादायक घटना घडली यात मुलीचा गाल फाटला गेल्याने ती गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कु. आराध्या आशीष मानकर (रा. गांधी वार्ड, बल्लारपूर) असे जखमी असलेल्या मुलीचे नाव आहे. डॉक्टरांनी चिमुकल्या आराध्यावर १९ टाक्यांची अवघड शस्त्रक्रिया केली आहे. आराध्या खेळत असताना एका श्वानाने तिच्या गालाचा चावा घेतल्या. ती रडायला लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरड केली असता श्वानाने पळ काढला. आराध्या रक्तबंबाळ झाली. घटनेची माहिती मुलीचे वडील आशीष मानकर यांना देण्यात आली. ते मिस्त्री काम करीत असल्याने त्यांना घटनेबाबत माहीती होताच कुटुंबीयांनी लगेच आराध्याला ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे दाखल केले तिथे प्राथमिक उपचार करून आराध्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात रेफर केले. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी १९ टाक्यांची शस्त्रक्रिया केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले या घटनेला काही वेळ होत नाही तोच शहरातील राणी लक्ष्मी वॉर्ड परिसरात भटक्या कुत्र्याने आणखी एका व्यक्तीस चावा घेतला असल्याची माहीती प्राप्त होत आहे. त्यामुळं अशा या पिसाळलेला व मोकाट श्वानाचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा अशी, मागणी नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments