पवनी कोळसा खाण - 2 बंदुकीच्या धाकावर कोळसा चोरी प्रकरणात 5 आरोपीना अटक, 18 मार्च पर्यंत पोलीस कोठडी (Pavani Coal Mine - 5 accused arrested in 2 gunpoint coal theft case, remanded in police custody till March 18)
राजुरा :- पवनी कोळसा खाण - 2 मध्ये बंदुकीच्या बळावर अज्ञात आरोपींनी दोन 14 चक्का हायवा व एक 12 चक्का हायवा कोळसा लुटल्याच्या घटनेने वेकोली सह जिल्हा प्रशासनात खळबळ उडवून दिली होती. सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे विभाग (LCB)ने स्वतःकडे घेऊन धडाकेबाज कामगिरी करत कोळसा लुटून नेणारे वाहनाची ओळख ही पटली असून कोळसा खाली केलेल्या जागेची माहिती ही पटली आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारकर्ता आपल्या शब्दावरून फिरला कधी बंदूक तर कधी चाकु असल्याचा आपल्या बयानात सांगू लागला त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने धक्कादायक माहिती दिली असून या प्रकरणात अनेक वेकोलीचे अधिकारी यांचा सहभाग असल्याचे सांगितले आहे. चंद्रपूर जिल्हा हा Black Gold City म्हणून प्रचलित आहे, जिल्ह्यात कोळसा भरपूर प्रमाणात असल्याने कोळसा चोरीचे अनेक प्रकरण सुद्धा पुढे आले आहे. पवनी कोळसा खाणीतून ट्रक क्रमांक एमएच 34 बीजी 6500, एमएच 34 बीजी 9595, एमएच 34 बी झेड 0430 मधून कोळसा चोरी झाल्याची तक्रार MSF चे नितीन चौधरी ने केली होती, चोरी करतेवेळी बंदूक सदृश्य वस्तूने मला घाबरविण्यात आले असे चौधरी याने आपल्या बयानात सांगितले होते, मात्र पोलीस चौकशी मध्ये त्याने अनेक उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय नितीन वर बळावला आणि त्याने खाकीपुढे गुन्हा कबूल केला विशेष म्हणजेच या प्रकरणात फिर्यादीच चोरट्याचा साथीदार असण्याची शक्यता आहे त्यामुळं वेकोलिचे अनेक वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात गुंतण्याचं शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणात 34 वर्षीय प्रणव साबळे, सय्यद सोहेब, नितीन चौधरी, परमजीत सिंग सतपाल सिंग चड्डा व शुभम बहुरीया याला अटक केली आहे. राजुरा पोलिसांनी आरोपीना न्यायालया पुढे हजर केले असता सर्व आरोपीना 18 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments