बल्लारपूर-राजुरा मार्गावरील पेट्रोल पंपावर 2 अज्ञात बंदूकधारी युवकांनी लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने दरोड्याचा प्रयत्न फसला (2 unidentified armed youths attempted to rob a petrol pump on Ballarpur-Rajura road, but the robbery attempt was thwarted by the vigilance of the employee.)
राजुरा :- रविवारी 26 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा - बामणी मार्गावर असलेले (कोतपल्लीवार) मध्ये अज्ञात 2 बंदूकधारी युवकांनी पेट्रोल पम्प लुटण्याचा प्रयत्न केला मात्र पेट्रोल पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी त्या युवकाचा प्रयत्न हाणून पाडला. 26 फेब्रुवारीला रात्री 2 ते 3 वाजताच्या दरम्यान 2 युवकांनी पेट्रोल पंपावर प्रवेश करीत कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक व जीवे मारण्याची धमकी देत पेट्रोल पंपावरील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने त्या युवकांचा दरोड्याचा प्लॅन फसला, व दोघांनी तिथून पळ काढला. यासंदर्भात या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. राजुरा पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवी कलम 393, 506, 34 व भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 नुसार गुन्हा नोंदविला असून ठाणेदार योगेश्वर पारधी अधिक तपास करीत आहेत.
संपादक - दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments