धक्कादायक ! चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे आदेश, साक्ष देण्यासाठी आयोगासमोर उपस्थित न राहिल्याने आयोगाने दिले आदेश (Shocking! The National Commission for Scheduled Castes and Tribes has ordered the arrest of Chandrapur Collector Vinay Gowda for not appearing before the Commission to testify.)

Vidyanshnewslive
By -
0

धक्कादायक ! चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे आदेश, साक्ष देण्यासाठी आयोगासमोर उपस्थित न राहिल्याने आयोगाने दिले आदेश (Shocking ! The National Commission for Scheduled Castes and Tribes has ordered the arrest of Chandrapur Collector Vinay Gowda for not appearing before the Commission to testify.)

मुंबई :- चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती आयोगाने दिले आहेत. आयोगासमोर साश्रीसाठी हजर न झाल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. आयोगाने गौडा यांना आपल्यासमोर हजर राहण्याचे समन्स जारी केले होते. 16 फेब्रुवारी रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश जारी केले होते. आदेश देऊनही आयोगासमोर हजर न झाल्याने त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात एका वृत्तवाहिनीच्या सूत्रानुसार जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी.सी.यांना अटक करुन आणन्याचे, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक श्री. रजनीश सेठ मुंबई यांना आदेश जारी. माननीय राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांनी दिले आदेश. पेशी तारीख 2/3/2023 आहे. दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांनी केली माननीय आयोगाकडे पुराव्यासह दिनांक 30/6/2022 ला तक्रार. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांना संविधानिक अधिकार अनुच्छेद 338A असतानांही जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा यांनी न्यायालयाचे, आयोगाच्या, समन्सचे उल्लंघन केले आहे. जिवती तालुक्यात कुंसुबी हा गाव मागील 23 वर्षांपासून तलाठी साझा क्रमांक 6 नगराळा येथे असतानांही शासन, प्रशासन, व जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री. अजय अण्णासाहेब गुल्हाने यांनी तो गाव राजुरा तालुक्यात दाखवून बोगस लिज 2031 पर्यंत कंपनीला करून दिली होते. व त्यापुर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी 20 वर्षाची लिज 2001 मध्ये दिली व शासनाची दिशाभूल करीत शासनाला मुर्ख बनवत आदिवासीची फसवणूक करीत होते. ही गंभीर बाब माननीय राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या निदर्शनास दिल्ली येथे तलाठी विनोद खोब्रागडे यानी आनुन दिली. मागणीत कुंसुबीचे 24 आदिवासीची जशीचा तशी 200 ऐकर जमीन वापस द्यावे. आणि कंपनीची लिज कायमस्वरूपी बंद करा. 

        42 वर्षाचा मोबदला आयोगाच्या माध्यमातून देन्यात यावी. कंपनी सह दोषी अनेक जिल्हाधिकारी चंद्रपूर, अनेक SDM राजुरा, अनेक तहसीलदार जिवती, व नायब तहसीलदार यांच्यावर अँट्रासिटीचा कायद्यानुसार फौजदारी कारवाई करावी. अशी मागणी मा. आयोगाला केली आहे. अखेर आयोगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना अटक करून हजर करा असे आदेश आज दिनांक 21/2/2023 ला पारीत केले. माननीय आयोगाला , खोटी, बनावट, बोगस, आणि काल्पनिक माहिती माननीय राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांना देने, व समन्स बजाऊनही उपस्थित न राहने महागात पडले. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी श्री.विनय गौडा जी.सी.यांचावर अटक वारंट निर्देश जारी केले. माननीय राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांनी निर्देश दिले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)