बल्लारपूर शहरात कॉलरी मार्गावर सुरु होणाऱ्या देशी दारूच्या दुकानाला स्थानिक महिलांचा विरोध, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांना निवेदन सादर ! (In Ballarpur town, local women protest against the country liquor shop starting on the colliery road, submit a statement to the guardian minister along with the administrative officers!)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर शहरात कॉलरी मार्गावर सुरु होणाऱ्या देशी दारूच्या दुकानाला स्थानिक महिलांचा विरोध, प्रशासकीय  अधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांना निवेदन सादर ! (In Ballarpur town, local women protest against the country liquor shop starting on the colliery road, submit a statement to the guardian minister along with the administrative officers!)


बल्लारपूर - बल्लारपूर शहरातील वस्ती विभाग येथील राणी लक्ष्मीबाई वॉर्ड, गांधी वॉर्ड, किल्ला वॉर्डातील महिलांनी वस्ती विभाग कडे जाणाऱ्या मुख्य रोड वर लोक वस्ती मध्ये देशी दारूचे दुकान उघडण्याची प्रशासन ने दिली आहे, देशी दारू दुकान विरोधात तिन्ही वॉर्डातील महिलांनी एकजुटीने सर्व प्रशासकीय अधिकारी व पालकमंत्री यांना निवेदन देऊन या भागात देशी दारू दुकान उघडण्याची परवानगी रद्द करून दुसरीकडे हलविण्यात यावी असे आशियाचे निवेदन दिले आहे महिलांचे म्हणण्यानुसार या परिसरात मागील पन्नास वर्षे पासून इथे वास्तवात आहे या परिसरात जव्हेरी कन्या शाळा, जनता सिटी ब्रँच शाळा, देवस्थान, तसेच दिवाणी न्यायालय100मीटर चा आत आहे इथेच माधुरी रेड्डी यांचा घरी लहान मुलांना शिकवणी वर्ग घेतात त्याचाच बाजूला सागर बियर शॉपी उघडण्यात आली आहे आणि आर, के, बार पण चालू आहे या दोन्ही दुकानामुळे शिकवणी करिता येणारे लहान मुलांना नाहक त्रास होत असून मुलांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्याच बाजूला देशी दारू दुकान उघडण्याची तयारी सुरू केली आहे त्याच बाजूला उज्वला बार पण आहे बार ला पार्किंग नसल्याने बार चा बाजू ने लोकवस्ती कडे जाणाऱ्या मार्गावर बार मध्ये येणारे लोक रस्त्यावरच गाडी लावल्याने वस्तीतील लोकांना ये-जा करिता खूबच त्रास होत आहे रोज काहींना काही कारणावरून भांडणे होत राहतात, येथे शिक्षणघेण्या करिता येणाऱ्या मुलामुलींना मानसिक त्रासाला सामोरे जावा लागत आहे, वॉर्डातील स्थानिक लोकांना एवढे मोठे नुकसान होता नाही देशी दारू दुकान चालू होतं असेल तर साधारण नागरिकांनी न्यायकरिता जावे कुठे, राज्य उत्पादन शुल्क विभाग ने सर्व नियम डावलून परवानगी दिलीच कशी? राज्य उत्पादन शुल्क चे जिल्हा आयुक्त संजय पाटील यांना वॉर्डातील महिला यांनी प्रश्न उपस्थित केला आहे? या विभागातील महिलांनी देशी दारू दुकान चा परवाना रद्द नाही केल्यास या योग्य निर्णय न झाल्यास येथिल महिला या विरोधात मोठे आंदोलने करण्याचा तयारीत आहेत, स्थानिक महिलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊस वर घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये आपली व्यथा जाहीर केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)