बल्लारपुरात हॉटेलच्या फलकासमोर लावले असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे बॅनर स्थलांतरित करणे चांगलेच भोवले, मागावी लागली जाहीर माफी ! The banner of Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary, placed in front of the hotel board in Ballarpur, was badly done, had to ask for a public apology!
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील नवीन बसस्थानक परिसरात एका प्रतिष्ठित हॉटेलच्या संचालकाच्या मुलांनी राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या आपल्या हॉटेलच्या फलकासमोर लावले असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या बॅनरला स्थलांतरित करणे चांगलेच भोवले सदर प्रकरण शिवभक्तांना माहीती होताच त्यांनी प्रशासना प्रति रोष व संबंधित हॉटेल मालकाविषयी कारवाई करण्याची मागणी केली.
याविषयीच्या अधिक माहीती नुसार बल्लारपूर शहरातील भारतीय स्टेट बँक समोर असलेले प्रतिष्टीत हॉटेल चे संचालक दिनेश आसवानी यांनी 19 फरवरी 2023 ला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने नवीन बसस्थानक परिसरात त्यांच्या हॉटेलच्या फलकासमोर लागले असलेले बॅनर स्थलांतरित केले ही बाब शहरातील नागरिकांना कळताच त्यांनी याविषयी प्रशासन व हॉटेल मालकाविषयी रोष व्यक्त केला व काल दि. 21 फेब्रुवारीला 11 वाजताच्या सुमारास नगर परिषद चौक परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ जमा होऊन कारवाई करण्याची मागणी केली वाढता रोष पाहता हॉटेल चे संचालक चंदू आसवानी यांनी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष बल्लू गिडवाणी तसेच पोलिस दल, राजकीय नेते यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात उपस्थित शिव भक्तांसमोर घडलेल्या प्रकार बद्दल जाहीर माफी मागितली व प्रकरण शांत झाले तत्पूर्वी नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणुन दंगा नियंत्रण पथकासह तगडा पोलिस बंदोवस्त घटना स्थळी हजर होता सदर आंदोलन राजू झोडे, प्रणय काकडे, चेतन पावडे, प्रतिक वाटेकर, राकेश वडस्कर, विवेक कुटेमाटे, राकेश लांडे, यांच्यासह अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments