Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

राज्यातील शिक्षक भर्तीला वेग मुलाखतीसह भर्ती प्रक्रिया सप्टेंबर अखेर पर्यंत तर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये (Teacher recruitment in the state gains momentum: the recruitment process—including interviews—is set to conclude by the end of September, while the second phase of teacher recruitment will take place in October.)

राज्यातील शिक्षक भर्तीला वेग मुलाखतीसह भर्ती प्रक्रिया सप्टेंबर अखेर पर्यंत तर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये (Teacher recruitment in the state gains momentum: the recruitment process—including interviews—is set to conclude by the end of September, while the second phase of teacher recruitment will take place in October.)

वृत्तसेवा :- राज्यात रखडलेल्या शिक्षक भरतीला आता वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील 'मुलाखतीशिवाय' प्रकारातील शिक्षक भरतीनंतर आता 'मुलाखतीसह' होणारी तब्बल १० हजार ३२८ पदांची भरती प्रक्रिया सप्टेंबर अखेर पूर्ण होईल. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षण सेवक आणि शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी मे-जून २०२५ मध्ये 'शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५' (टेट) झाली. यामध्ये पात्र ठरलेल्या आणि स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या एक लाख ७० हजार १०८ उमेदवारांमधून सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. या उमेदवारांना भरतीसाठी 'मुलाखतीशिवाय' आणि 'मुलाखतीसह' या दोन प्रकारांतील जाहिराती पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त झाल्या आहेत. याच प्रक्रियेतील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये राबविण्यात येणार आहे. याद्वारे जवळपास पाच हजार शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. यामुळे हजारो भावी शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 'मुलाखतीशिवाय' प्रकारातील गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. यात जवळपास जिल्हा परिषद, नगरपालिका/नगरपरिषद, महापालिका, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा, शासकीय विद्यानिकेतन, खासगी शैक्षणिक संस्थांमधील १९ हजार ७५४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्या पदसंख्येसाठी १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली. या टप्प्यातील समांतर आरक्षणात उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही पदे त्या-त्या संवर्गातील इतर उमेदवारांसाठी 'कन्व्हर्टेड राउंड'द्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही प्रक्रिया सप्टेंबरच्या पहिल्या काही दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर या टप्प्यातील मुलाखतीसह पदभरतीची प्रक्रिया सुरू होईल. 
          पहिल्या टप्प्यात मुलाखतीसह शिक्षक भरतीसाठी १० हजार ३२८ पदसंख्या आहे. या प्रक्रियेसाठी शासन निर्णयानुसार ४५ दिवसांचा कालावधी असणार आहे. यात संबंधित उमेदवारांना मुलाखतीला बोलाविणे, एका उमेदवाराला तीन ठिकाणी मुलाखत देण्याची संधी, शिफारस झालेल्यांना नियुक्तीचे आदेश, नियुक्ती देऊनही रुजू न झाल्यास प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना संधी देणे, ही प्रक्रिया राबविली जाईल. साधारणतः सप्टेंबरअखेरपर्यंत मुलाखतीसह शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे शिक्षण उपसंचालक राजेश शिंदे यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. सप्टेंबर अखेरपासून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीच्या प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू होणे अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात खासगी अनुदानित शाळांची बिंदूनामावली पूर्ण होऊ शकली नाही, त्या शाळांमधील शिक्षक भरतीची पदे दुसऱ्या टप्प्यात भरली जाणार आहेत. या टप्प्यात कनिष्ठ महाविद्यालयांसह धाराशिव, पालघर यांसह काही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील जवळपास पाच हजार शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या