Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

सुब्बई ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय, सरपंचासह सर्व सदस्यांवर अविश्वास ठराव सर्वानुमते मंजूर (Historic decision at Subbai Gram Sabha: No-confidence motion against the Sarpanch and all members passed unanimously.)

सुब्बई ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय,  सरपंचासह सर्व सदस्यांवर अविश्वास ठराव सर्वानुमते मंजूर (Historic decision at Subbai Gram Sabha: No-confidence motion against the Sarpanch and all members passed unanimously.)

सरपंचा सुरेखा सुधाकर आत्राम मागितली सर्व गावकऱ्यांची माफी, ग्रामसभेत पिण्याचे पाणी सुद्धा ठेवण्यात आले नाही



राजुरा :- राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सुब्बई गावात ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती आणि सदर ग्राम सभेला युवा खूप मोठ्या संख्येने हजर झाले आणि ग्राम पंचायत मधील भ्रष्टाचार पाहून सरळ ग्राम पंचायत सरपंच्या सुरेखा सुधाकर आत्राम सह सर्व सदस्यांचा राजीनामा मागू लागले परंतु उपस्थित सरपंचा सुरेखा सुधाकर आत्राम यांनी राजीनामा नाही परंतु सर्व गावाची माफी मागतो असे उत्तर दिले परंतु उपस्थित सर्व नागरिक यांनी राजीनामाच हवा असल्याचे स्पष्ट केले आणि शेवटी ग्रामसभेत ठराव क्रमांक 16 सरपंचा सुरेखा सुधाकर आत्राम सह सर्व सदस्य यांच्यावर अविश्वास ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सुब्बई येथे सरपंचा म्हणून पदभार स्वीकारून 4 वर्षाचा कालावधी लोटून सुध्या एकही महिला ग्राम सभा घेण्यात आली नाही, 20 आगस्ट 2026 ला ग्राम सभा असल्याचे एक दिवस अगोदर गावात दिवंडी देण्यात आले आणि 20 तारखेला ग्राम सभेच्या ठिकाणी 400 हून अधिक संख्येने ग्रामस्त ग्राम सभेला उपस्थित झाले होते परंतु उपस्थित लोकांची गर्दी पाहून सरपंचा सुरेखा सुधाकर आत्राम सभा रद्द करण्यात आली असे सांगून सभा घेण्याचे टाळले, ग्रामस्थांनी आपली रोजी गमावून सभेसाठी उपस्थित झाले त्यांचे आर्थिक नुकसान झाले हे दृश्य पाहून उपस्थित युवा सदर ग्राम सभा झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका घेतले आणि शेवटी ग्रामसभेत सरपंचा यांनी उपस्थिती लावली यामुळे गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि ग्राम सभेत सरपंचा सुरेखा सुधाकर आत्राम सह सर्व ग्राम पंचायत सदस्य यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. आणि जर येत्या 15 दिवसांत ग्राम पंचायत च्या सरपंच्या सुरेखा सुधाकर आत्राम सह सर्व सदस्यांना अपात्र केले नाही तर प्रशासना विरोधात गावातील सर्व नागरिक, महिला, पुरुष आणि युवा मोठ्या संख्येने आंदोलन करणार असल्याचे युवकांनी सांगितले.. ग्रामसेवक यांच्याशी विचार विमाश केल्यानंतर त्यांचे म्हणणे असे की आमच्या ग्रामसेवकांचे आंदोलन सुरू असल्यामुळे ग्रामसभेत आम्ही बसणार नाही. सरपंचांना अधिकार आहे ते निर्णय घेऊ शकतात असे त्यांचे ग्रामसेवकांचे अभिप्राय मिळाले. गावातील युवकांनी जे पाऊल चालले त्यासाठी समस्त गाव करी अभिनंदन करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या