स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बिहार ते चंद्रपूर अवैध शस्त्र तस्करीचा डाव उधळला; दोन पिस्तुले, १३ जिवंत काडतुसे जप्त (Local Crime Branch operation: Plot to smuggle illegal weapons from Bihar to Chandrapur foiled; two pistols and 13 live cartridges seized.)
६ लाख ४८ हजारांचा मुद्देमालासह तीन संशयित ताब्यात
प्राथमिक चौकशीत ही शस्त्रे बिहार राज्यातून आणण्यात आली असून, नागपूर येथे पोहोचल्यानंतर ऑनलाइन वाहन बुक करून चंद्रपूरमध्ये विक्री करण्यासाठी आणली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या तस्करीमागे नेमके कोणते जाळे कार्यरत आहे, शस्त्रांचा पुरवठा कोण करत आहे आणि चंद्रपूरमध्ये त्यांची विक्री कोणाला केली जाणार होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये दुर्गेशकुमार सुधीर मिश्रा (२६), रा. गोपालपुर, ता. केवटी, जि. दरभंगा; रविकुमार राजकुमार पासवान (१९), रा. पिंडारून, ता. केवटी, जि. दरभंगा; आणि सुनिलकुमार विजय साहानी (२०), रा. गोपालपुर, ता. केवटी, जि. दरभंगा, बिहार यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे नाकाबंदीदरम्यान नागपूरकडून चंद्रपूरकडे येणारी एमएच १४ जीडी ०७०८ क्रमांकाची Tata Zest कार पोलिसांनी थांबवली. वाहनातील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्यान त्यांची झडती घेण्यात आली. यावेळी दोन बनावट लोखंडी पिस्तुलसदृश अग्निशस्त्रे, दोन मॅगझिन आणि १३ जिवंत काडतुसे आढळून आली. याशिवाय तीन मोबाइल फोन व वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे बिहार ते चंद्रपूर अशा संभाव्य अवैध शस्त्रतस्करीच्या मार्गावर पोलिसांनी मोठा घाव घातला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पडोली पोलिसांकडून सुरू असून, या तस्करीच्या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि, दिपक काँक्रेडवार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सर्वेक्ष बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सतिश अवथरे, लालु यादव, इसान खान, हिरालाल गुप्ता, संदिप कांबडी, शरद कुडे, अजय बागेसर, गणेश भोयर, रामा बिंगेवार, पोअं शशांक बदामवार, किशोर वाकाटे, शेखर माथनकर, चापोअं/वृषभ बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच पोहवा कार्तीक खनके, पोअ गुणंवत, अनिमेश पोस्टे सायबर सेल, चंद्रपुर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या