नवभारत महाविद्यालय मूल येथे 16 ऑगस्ट ला नवोदय, शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर (Pre-examination guidance camp for Navodaya, Scholarship, and Sainik School exams at Navbharat Mahavidyalaya, Mul, on August 16.)
मूल :- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी व आठवी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि सैनिक स्कूल प्रवेश परीक्षासाठी बसणाऱ्या हिंदी, इंग्रजी व मराठी माध्यमातील शासकीय शाळा, खाजगी अनुदानित शाळा व इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता नवभारत हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, मूल येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन प्रमुख अतिथी केंद्र संचालिका आम्रपाली बागेसर, केंद्र प्रमुख पेंदोर, प्राचार्य बारसागडे, प्रा.महेश पानसे, पत्रकार दुर्योधन धोंगडे व तज्ञ मार्गदर्शक किशोर नरड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सदर शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक परीक्षा पद्धती, नविन अभ्यासक्रम माहिती, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका स्वरूप, वेळेचे, वेळेचे नियोजन व अभ्यास तंत्र या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिक स्कूल परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या