स्वातंत्र्य दिन व संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Independence Day and the Architect of the Constitution, Dr. Babasaheb Ambedkar)
बल्लारपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याला फक्त "परकीय सत्तेपासून मुक्ती" एवढंच मर्यादित मानत नव्हते तर त्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय अशा तिन्ही पातळ्यांवरील माणसाची मुक्तता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या मसुदा समितीला दिलेल्या निवेदनात स्वातंत्र्याविषयीं म्हटले कि, "स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची संधी मिळणे. आणि ही संधी मिळवून देणारी सामाजिक व्यवस्था म्हणजे खरी लोकशाही आहे." Ref.States and Minorities, 1947 राजकीय स्वातंत्र्याचा अधिकार - मतदानाचा अधिकार, कायद्यासमोर समानता, भाषण- संघटना स्वातंत्र्य. सामाजिक स्वातंत्र्याचा अधिकार - एका माणसाने दुसऱ्या माणसाला गुलाम न समजणे. जातीभेद, अस्पृश्यता नसलेला समाज. आर्थिक स्वातंत्र्याचा अधिकार "प्रत्येकाला जगण्यासाठी साधने, शिक्षण आणि मालमत्तेचा अधिकार. उपासमारीपासून मुक्ती" Ref. Annihilation of Caste 25 नोव्हे.1949 देशाने संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान स्विकारले तेव्हा ते भाषण म्हणतात "राजकीय लोकशाही जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही शिवाय आहे, तोपर्यंत ती केवळ एक भास आहे." Ref.Constitution Assembly Debates, 25 Nov 1949 स्वातंत्र्य म्हणजे फक्त साखळ्या तोडणे नाही तर स्वातंत्र्य म्हणजे अशी परिस्थिती निर्माण करणे ज्यामध्ये प्रत्येक माणूस माणूस म्हणून जगू शकेल, वाढू शकेल. Ref. What Congress and Gandhi Have Done to the Untouchables, 1945 आणि शेवटी ते म्हणतात "मी माझ्या समाजाला तीन गुरुमंत्र दिले आहेत - शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा. कारण शिक्षणाशिवाय स्वातंत्र्य अंध आहे, संघटने शिवाय ते अशक्त आहे आणि संघर्षाशिवाय ते अशक्य आहे." डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठलाही भेदभाव न करता सर्वाना समान हक्क समान संधी भारतीय संविधानाद्वारे करून दिल्यात आपण आपल्यालाच प्रश्न विचारावा खरंच मी स्वतंत्र झालो का? माझ्या स्वातंत्र्याला कुणी छेडछाड करतो का? जर असे होत असेल तर आपण स्वतंत्र नाही. त्याकरिता जागृत होने प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य बनते.
लेखन/संकलन :- डॉ. संजय दुधे, बल्लारपूर
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या