Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

स्वाधार योजनेसाठी आता शासकीय वसतिगृहाचा अर्ज बंधनकारक (Application for a government hostel now mandatory for the Swadhar Scheme.)

स्वाधार योजनेसाठी आता शासकीय वसतिगृहाचा अर्ज बंधनकारक (Application for a government hostel now mandatory for the Swadhar Scheme.)

व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. चालू शैक्षणिक वर्ष सन 2026-27 पासून या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, त्यांनाच स्वाधार योजनेसाठी पात्र ठरवले जाईल. मात्र जे विद्यार्थी वस्तीगृहाकरिता अर्ज करणार नाहीत, ते दोन्ही योजनांपासून वंचित राहतील. ज्या तालुक्यात वसतिगृहे नाहीत, तेथे हा नियम शिथिल असला तरी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या ऑनलाईन पोर्टलवर व्यावसाईक अभ्यासक्रम करिता तसेच मागील वर्षी स्वाधार योजनेचा लाभ घेण्यात आलेल्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नुतनीकरण करिता 15 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज नोंदविणे आवश्यक आहे, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी कळविले आहे.
           सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय वसतिगृहाकरीता सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. जिल्ह्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर लवकरात लवकर ऑनलाईन रित्या अर्ज नोंदणी करावे तसेच सदर अर्जाची प्रत संपूर्ण कागदपत्रासह संबंधित वसतिगृह कार्यालयामध्ये सादर करावी. जे विद्यार्थी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करणार नाहीत व वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहिल्यास त्याला विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर व वसतिगृह कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या