Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेशपानसे यांची नियुक्ती (Prof. Mahesh Panse appointed as State President (Selection Committee) of the Maharashtra State Journalists' Association.)

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे यांची नियुक्ती (Prof. Mahesh Panse appointed as State President (Selection Committee) of the Maharashtra State Journalists' Association.)

मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी ज्येष्ठ पत्रकार, विश्लेषक व संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रा. महेश पानसे यांची राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गत दोन वर्षापासून संघटनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.  संघटनेचे राज्य अध्यक्ष निलेश सोमानी, राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्या सुचनेनुसार राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी प्रा. महेश पानसे यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमीत केले आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रा. महेश पानसे यांनी राज्य पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पद, नागपूर विभाग अध्यक्ष पद, विदर्भ अध्यक्षपद, राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळून आपले संघटन कौशल्य दाखवून दिले आहे. गत 30 वर्षापासून अनेक अग्रगण्य वर्तमान पत्रांमधून प्रगल्भ पत्रकारीता सिद्ध केली आहे. 
                  गत 15 वर्षापासून राज्य पत्रकार संघात काम करताना संपूर्ण विदभॅ प़देशात संघटनेची व्याप्ती झपाट्याने वाढविण्यात प्रा. महेश पानसे यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चिमूर, ब़म्हपूरी, नागपूर येथे पत्रकारांचे भव्य राज्य अधिवेशन सफल झाली आहेत हे विशेष. पत्रकारीता व पत्रकार संघटन यातून विदर्भातील शेकडो तरुणांना पत्रकारितेच्या क्षेत्रात पुढे आणण्यात प्रा.महेश पानसे यांचा मोठा वाटा राहीला आहे प्रा.महेश पानसे यांच्या राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेचे राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या