Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

सरदार पटेल महाविद्यालयात 1 ऑगस्ट २०२६ रोजी ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन. (District-level competitions will be organized at Sardar Patel College on August 1, 2026, under the ‘Drug-Free Youth – Developed India’ initiative.)

चंद्रपूर -: मेरा युवा भारत, चंद्रपूर आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय विविध सांस्कृतिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 1 ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन युवकांनी आपल्या सर्जनशीलतेचा आणि कलागुणांचा उपयोग करून नशामुक्त, निरोगी व विकसित भारताच्या निर्मितीसाठी सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत संगीत (लोकगीत), नृत्य, रील व लघुपट, पथनाट्य / मूक अभिनय, स्लॅम पोएट्री, चित्रकला, वादविवाद / वक्तृत्व आणि घोषवाक्य लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 
           या स्पर्धांमध्ये १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘नशामुक्त भारत’ घडविण्याच्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यासाठी अधिक माहितीसाठी जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, चंद्रपूर - 77090 31660, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड -9518769989 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या