इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नवविक्रम स्थापित केल्याबद्दल भारती डुंबेरे यांचा सांस्कृतिक विचार मंच व आम्रपाली बुद्ध विहार सातखोलीच्या वतीने सत्कार (Bharti Dumbere felicitated by Sanskrutik Vichar Manch and Amrapali Buddha Vihar, Satkholi, for setting a new record in the India Book of Records.)
बल्लारपूर :- इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपल्या गायन कौशल्याने नवविक्रम स्थापित केल्याबद्दल भारती डुंबेरे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आम्रपाली बुद्ध विहार गोरक्षण वार्ड, सात खोली परीसर, बल्लारपूर येथे दि. 25 जुलै 2026 रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अपर्णा धोटे मॅडम, गुरूनानक विज्ञान महाविद्यालय, बल्लारपूर ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रदीप लोहकरे, उच्च माध्यमिक शिक्षक, शासकीय आश्रमशाळा, खमनचेरू, मा. अनुकला वाघमारे, मा. अजय चव्हाण तथा मंडळाचे अध्यक्ष डॉ. अरुण लाडे व सल्लागार डॉ. संजय दुधे यांची मंचावर उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. संजय दुधे, रेखा मेश्राम, अमीत झाडे, आशा भाले, आशा ढेंगळे, डॉ. निशिगंधा दुधे, प्रकाश तोहगावकर यांनी मनोगते व्यक्त केली. प्रमुख अतिथी मा. अनुकला वाघमारे व मा. अजय चव्हाण यांचीही यथोचित भाषणं झालीत. सदर कार्यक्रमाचे विशेष अतिथी व वक्ते मा. प्रदीप लोहकरे यांनी आपल्या भाषणातून उपस्थितात जोश निर्माण केला. सत्कारातूनच भारताला पुन्हा एकदा बुद्ध धम्माची ओळख झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्काराच्या वेळी केळुस्कर गुरूजींनी बाबासाहेबांना बुद्ध चरीत्र भेट दिले होते. पुढे बाबासाहेबांनी बुद्ध धम्म पुनर्जिवित केला आणि भारताला धम्माची नव्याने ओळख करून दिली. पुढे भाषणात त्यांनी आपल्या कर्तव्याचे वहन बुद्ध धम्मानुसार कसे केले जावे यावरही सुंदर विवेचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. अपर्णा धोटे यांनी, संविधान हेच सर्वांच्या उन्नतीचे माध्यम आहे. ते वाचले तरच आपले अस्तित्व व स्वातंत्र्य अबाधित राहील, असे प्रतिपादन केले. महिलांनी वेळोवेळी स्वतःला सिद्ध केले आहेत. आज सशक्त झालेल्या महिलांनी म. फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान कधी विसरू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अरुण लाडे यांनी केले. सुत्रसंचालन शालिनी वावरे यांनी तर रीता लाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शितल झाडे, प्रियंका नाईक, धम्मदीनी तोहगाकर इ. सदस्यांचे सहकार्य लाभले. सांस्कृतिक विचार मंच व आम्रपाली बुद्ध विहार येथील बहुसंख्य सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या