पूर्व विदर्भासह अमरावती व यवतमाळ जिल्ह्याना उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात रेड अलर्ट, तर चंद्रपूरसह पूर्व विदर्भाला ऑरेंज अलर्ट (Heavy rainfall warning issued for Amravati and Yavatmal districts along with Eastern Vidarbha; a 'Red Alert' has been declared for Yavatmal and Amravati districts for tomorrow, while an 'Orange Alert' is in place for Chandrapur and Eastern Vidarbha.)
मुंबई :- जुलै महिन्याचा शेवटचा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण भारतासाठी धोकादायक ठरु शकतो. 31 जुलैला महाभयानक पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, भारतातील 22 राज्यांना IMD ने मोठा अलर्ट दिला आहे. पुढील 24 तासांत पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, काही ठिकाणी सुमारे 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे तसेच अनावश्यक काम असल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले. पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशीम, वर्धा, हिंगोली, परभणी, नांदेड, आणि बुलढाणा या जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या