Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

अखेर केंद्रातील मोदी सरकार झुकलं ! सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ! (Finally, the Modi government at the Centre has yielded! A major victory for the CJP's agitation; Dharmendra Pradhan has resigned!)

अखेर केंद्रातील मोदी सरकार झुकलं ! सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ! (Finally, the Modi government at the Centre has yielded! A major victory for the CJP's agitation; Dharmendra Pradhan has resigned!)

वृत्तसेवा :- कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनला सर्वात मोठं यश मिळालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सीजेपीनं लावून धरली होती. यासाठी महिन्याभरापासून सीजेपीचं आंदोलन सुरू होतं. अखेर प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीजेपीसह काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी केंद्रीय मंत्री धर्मंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सरकार सोबत झालेल्या दोन बैठकांमध्ये राजीनाम्याचा विषय लावून धरला. पण सरकार याबद्दल फारसं अनुकूल नव्हतं. तर दुसऱ्या बाजूला प्रधान यांची राजीनाम्याबद्दल कोणतीही तडजोड होणार नाही, अशी ठाम भूमिका सीजेपीनं घेतली होती. यानंतर अखेर प्रधान यांनी राजीनामा दिला. सीजेपीच्या शिष्टमंडळाशी आज तिसऱ्या टप्प्यातील चर्चा सरकार करणार होतं. दुपारी साडे तीनच्या सुमारास बैठकीची वेळ ठरली होती. ही बैठक होण्यापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. प्रधान यांनी त्यांचा राजीनामा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल प्रधान यांनी त्यांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावर राजीनाम्याची घोषणा करताना प्रधान यांनी मंत्रिपदावरुन पायउतार होण्यामागील कारणदेखील सांगितलं आहे. '२० लाखांहून अधिक विद्यार्थी नीटची परीक्षा देतात. ती परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं होण्यास प्राधान्य दिलं. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, विद्यार्थी आणि पालकांच्या साथीनं २१ जून २०२६ रोजी पुन्हा यशस्वीरित्या परिक्षेचं आयोजन केलं. १६ जुलैला या परिक्षेचा निकाल लागला. त्यात अनेक गरीब आणि वंचित कुटुंबांमधील प्रतिभा संपन्न विद्यार्थ्यांना यश मिळालं. पण काही जबाबदार पदांवर बसलेल्यांनी विद्यार्थ्यांची दिशाभूल केली. त्यामुळे मला दु:ख झालं,' असं प्रधान यांनी एक्स पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या