Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला चंद्रपूरसह बल्लारपूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध राजकीय पक्षाचाही सहभाग (Spontaneous response to the Vanchit Bahujan Aghadi's 'Maharashtra Bandh' in Chandrapur and Ballarpur taluka; various political parties also participated.)

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला चंद्रपूरसह बल्लारपूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध राजकीय पक्षाचाही सहभाग (Spontaneous response to the Vanchit Bahujan Aghadi's 'Maharashtra Bandh' in Chandrapur and Ballarpur taluka; various political parties also participated.)

चंद्रपूर :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला चंद्रपूर शहरासह बल्लारपूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चंद्रपूरातील विविध शाळा महाविद्यालयांना सकाळीच सुट्टी देण्यात आली तसेच चंद्रपूर शहरातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठान स्वयंसफ्रुतीने बंद ठेवून विद्यार्थ्यां विरोधात दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या पोलीस कारवाई बाबत रोष व्यक्त करण्यात आला बल्लारपूर शहरातील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, व्यापारी आस्थापना तसेच विविध व्यावसायिक व्यवहार दिवसभर बंद राहिल्याने शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला. 


          बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष अभिलाष चुनारकर, वंचित बहुजन आघाडीचे शहर महासचिव गौतम रामटेके, शहराध्यक्ष उमेश कडू, तालुका अध्यक्षा नम्रता साव आणि शहराध्यक्षा रेखा पागडे यांनी नागरिक, व्यापारी, विद्यार्थी व विविध सामाजिक संघटनांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. बंद दरम्यान बल्लारपूरमधील सर्व प्रमुख शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडावे यासाठी विविध सामाजिक संघटना, समविचारी राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी सहकार्य केले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती आयोजकांनी दिली. 
         यावेळी दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन, समता सैनिक दल, भीम आर्मी बल्लारपूर, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. संपूर्ण बंद शांततेत पार पडल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या