पुणे : सहायक प्राध्यापक पदासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ६ सप्टेंबर रोजी होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, आता ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे विद्यापीठाच्या सेट विभागाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
सुरुवातीला सेट परीक्षा २६ जुलै रोजी आयोजित करण्यात येणार होती. मात्र, त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरळसेवा भरती परीक्षा आणि ७ ते २६ जुलै दरम्यान असणारी आषाढी वारी यामुळे वाहतुकीची कोंडी व नियोजनात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही परीक्षा ६ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता ६ सप्टेंबरला 'सीबीएसई'ची 'सीटीईटी' परीक्षा पूर्वनियोजित असल्याने उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी सेट परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ६ सप्टेंबर ऐवजी आता २७ सप्टेंबर रोजी सेट परीक्षा आयोजित करण्यात येईल, असे सेट विभागानेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या