Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 47 अधिकारी तडकाफडकी बडतर्फ, CJP च्या आंदोलनाला मोठं यश (Major decision by the Central Government: 47 officials summarily dismissed; a major victory for the CJP's agitation.)

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 47 अधिकारी तडकाफडकी बडतर्फ, CJP च्या आंदोलनाला मोठं यश (Major decision by the Central Government: 47 officials summarily dismissed; a major victory for the CJP's agitation.)

वृत्तसेवा :- नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मधील ४७ अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यापैकी काहींविरोधात कायदेशीर कारवाईचीही शक्यता आहे. याशिवाय, NTA ची संपूर्ण प्रशासकीय रचना पुढील महिनाभरात बदलण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी एजन्सीच्या कामकाजात मोठे बदल केले जाणार आहेत. तसेच, सध्या सुरू असलेल्या आउटसोर्सिंग व्यवस्थेतही व्यापक सुधारणा करण्यात येणार असून, भविष्यात पेपरफुटीसारख्या घटनांना आळा घालण्यावर सरकारचा भर असणार आहे. 
          सध्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) देशभरात 15 ते 20 राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश आणि भरती परीक्षा आयोजित करते. यामध्ये JEE (Joint Entrance Examination), NEET (National Eligibility cum Entrance Test) आणि CUET (Common University Entrance Test)या प्रमुख परीक्षांचा समावेश आहे. याशिवाय इतर अनेक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारीही NTA कडे आहे. अलीकडील पेपरफुटीच्या आरोपांनंतर आणि परीक्षा प्रक्रियेवर उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर NTA मध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या