Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

‘पीएम यशस्वी’ शिष्यवृत्ती योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन Call to apply for the ‘PM YASASVI’ scholarship scheme by August 31.)

पीएम यशस्वी’ शिष्यवृत्ती योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन Call to apply for the ‘PM YASASVI’ scholarship scheme by August 31.)

अमरावती -: ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना अकरावीपर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी अँड डीएनटी स्टुडंट्स अंडर पीएम यशस्वी ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या scholarships.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे, असेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम पोर्टलवर 'New Registration' करावे. मिळालेला Application ID व पासवर्ड वापरून 'Fresh Login (AY २०२६-27)' अंतर्गत अर्ज भरावा. अर्जात वैयक्तिक, शैक्षणिक आणि बँक खात्याचा तपशील भरून जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, गुणपत्रक, प्रवेश प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत ही कागदपत्रे पीडीएफ, जेपीजीई स्वरूपात अपलोड करावीत. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून घ्यावी. एकदा 'Final Submit' केल्यावर अर्जात बदल करता येत नाही. अर्ज सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची प्रिंट काढून शाळेत संपर्क साधावा, जेणेकरून शाळेचे 'Institute Nodal Officer' तो अर्ज ऑनलाईन पडताळू शकतील. वेळापत्रकानुसार विद्यार्थी अर्ज प्रक्रिया 31 ऑगस्ट पर्यंत खुली असली, तरी शाळास्तरावरील पडताळणी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत आणि जिल्हा, राज्यस्तरावरील पडताळणी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाईल. अर्ज करताना मोबाईल व ईमेल सक्रिय असणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो. याकरिता शाळांच्या मुख्याध्यापकांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या