Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

29 जुलै रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यानी निर्गमित केले आदेश (Holiday declared for schools and colleges on July 29; District Collector issues orders.)

29 जुलै रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यानी निर्गमित केले आदेश (Holiday declared for schools and colleges on July 29; District Collector issues orders.)

चंद्रपूर -: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 29 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, तसेच जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी 29 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सदर आदेश जिल्हाधिकारी वसूमना पंत यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाले असून नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय 07172 - 250077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आदेशात नमूद आहे.



संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या