Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

ईश्वर- रखुमाई चव्हाण सन्मान सोहळा.... गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप ! (Ishwar-Rakhumai Chavan Felicitation Ceremony... A pat on the back for high achievers!)

ईश्वर- रखुमाई चव्हाण सन्मान सोहळा.... गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप ! (Ishwar-Rakhumai Chavan Felicitation Ceremony... A pat on the back for high achievers!)

नागभीड :- शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुकाचे बोल सदोदीत असतातच, मात्र ग्रामिण, खेडे विभागातील गुणवंत विदयार्थी व विदयार्थीनींचा सत्कार करून, मार्गदर्शन करुन प्रोत्साहीत करण्याचे महतकार्य चव्हाण परिवारातर्फे गत अनेक वर्षापासून सुरू आहे. ईश्वर रखुमाई चव्हाण स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी प्रमाणे यंदाही सदर सोहळा तालुक्यातील मिंथूर येथील समाज सभागृहात पार पडला. नवेगाव आणि मिंथूर या ग्रामिण परिसरातील वर्ग 10 आणि वर्ग 12 मधून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारा ठरला. यात वर्ग 12 वीचे 18 आणि वर्ग 10 वीचे 38 असे एकूण 56 विध्यार्थ्यांचा सत्कार मान्यवर मंडळींचे हस्ते संपन्न झाला. वर्ग 12 मधून प्रथम क्रमांक कु क्रिस्ती कुळे गुण 70.67 % तर वर्ग 10 मधून प्रथम क्रमांक कु अश्विनी प्रवीण लटारे गुण 89% यांना ट्राफी व शालेय वस्तू आणि रोख रक्कम देउन सत्कारीत करण्यात आले. तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि ट्राफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. चावरे मुखाध्यापिका धर्मराव कन्या विद्यालय आणी मार्गदर्शक श्री. विनोदजी भैया मुख्याध्यापक ने. हि. विद्यालय नवेगाव तसेच इतर उपस्थिती सौ. विशाखाताई डोंगरे सरपंच मिंथूर, श्री अरुण ईश्वरजी चव्हाण सर बाळापूर हे होते .सर्व मान्यवरानी विदयाथ्यांना मार्गदर्शन केले काही पालकांनी आणि काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. रतीराम चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. प्रज्ञा चव्हाण यांनी केले. शेवटी श्री अंगद चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या