Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

एसआयआर मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 86.56 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण - जिल्हाधिकारी वसुमना पंत (Mapping of 86.56% of voters in the district completed under the SIR campaign – District Collector Vasumana Pant)

एसआयआर मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 86.56 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण - जिल्हाधिकारी वसुमना पंत (Mapping of 86.56% of voters in the district completed under the SIR campaign – District Collector Vasumana Pant)

चंद्रपूर -: भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, त्रृटीरहित व सर्वसमावेशक ठेवण्याकरीता महाराष्ट्रात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात एसआयआर मोहिमेंतर्गत 86.56 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
           चंद्रपूर जिल्ह्यातील 70-राजुरा मतदारसंघात 92.99 टक्के मॅपिंग, 71-चंद्रपूर मध्ये 70.18 टक्के मॅपिंग , 72-बल्लारपूर मध्ये 87.25 टक्के मॅपिंग, 73-ब्रम्हपुरी 92 टक्के मॅपिंग, 74-चिमूर 93.13 टक्के मॅपिंग, 75-वरोरा मतदारसंघात 88.04 टक्के मॅपिंग अशी एकूण सहाही मतदारसंघात सरासरी मॅपिंगची टक्केवारी एकूण 86.56 आहे. जिल्ह्यातील एकूण 17 लक्ष 97 हजार 655 मतदारांपैकी 15 लक्ष 56 हजार 064 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत पात्र मतदारांची नोंदणी, मतदारांच्या तपशीलांची पडताळणी, आवश्यक दुरुस्ती, स्थलांतरित मतदारांच्या नोंदी अद्ययावत करणे, दुबार नोंदीची तपासणी तसेच मतदार यादी शुद्धीकरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे. मतदारांनी मतदार यादीतील आपली माहिती तपासून आवश्यक असल्यास नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, दुरुस्ती अथवा इतर आवश्यक बाबींसाठी विहित कालावधीत दावे व हरकती सादर कराव्यात. अचूक व अद्ययावत मतदार यादी ही मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा पाया आहे. सदर प्रक्रियेमध्ये बूथस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरभेटी घेऊन मतदारांची माहिती पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींचा सहभाग राहणार आहे. नागरिकांनी या प्रक्रियेमध्ये सहकार्य करून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
          असे आहे वेळापत्रक विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 1) प्रशिक्षण व पूर्वतयारी - 20 ते 29 जून 2026, 2) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरभेटी - 30 जून ते 29 जुलै 2026, 3) मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण- 29 जुलै 2026 पर्यंत, 4) प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी- 5 ऑगस्ट 2026, 5) दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026, 6) दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी- 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर 2026 आणि 7) अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी- 7 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये इन्युमरेशन फॉर्मचे डाउनलोड कार्य 100 टक्के पूर्ण झाले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या