Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

वनविभागाने राज्यातील २१६ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या, चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या (Forest department has regular transfers of 216 forest range officers in the state, transfers of total 15 officers in Chandrapur district)

वनविभागाने राज्यातील २१६ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या, चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या (Forest department has regular transfers of 216 forest range officers in the state, transfers of total 15 officers in Chandrapur district)

मोहर्ली बफरचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना एका वर्षाची मुदतवाढ

चंद्रपूर :- राज्याच्या महसूल व वनविभागाने राज्यातील २१६ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या संदर्भात सूत्रांच्या माहितीनुसार या बदल्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, मोहर्ली बफरचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. 


              गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांची चंद्रपूर जिल्ह्यातील ताडगाव संशोधन केंद्रात बदली करण्यात आली आहे. मोहर्ली ताडोबा कोअरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणकुमार गौंड यांची बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, चिचपल्ली येथे नियुक्ती करण्यात आली आहे. मुरूमगाव पश्चिम, गडचिरोली येथील आरएफओ मृणाली करहाडे यांची चंद्रपूर संशोधन केंद्र क्रमांक १ येथे बदली करण्यात आली. रुंदन काटकर यांची ताडोबा कोअरच्या कोलसा येथून कोठारी प्रादेशिक विभागात बदली करण्यात आली आहे. सुरेखा दहीकर यांची ताडोबा कोअरच्या कोलसा वनपरिक्षेत्रात नियुक्ती झाली आहे. आकाश मल्लेलवार यांची गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी वनपरिक्षेत्रात, आम्रपाली खोब्रागडे यांची जिवती वनपरिक्षेत्रात, तर योगिता मडावी यांची कन्हारगाव वनपरिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे. सुभांगी कृष्णापूरकर यांची ताडोबा बफरच्या कोठारी वनपरिक्षेत्रात, किशोर देऊरकर यांची ताडोबा कोअरच्या कारवा वनपरिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगणघाट सामाजिक वनीकरण विभागातून स्वाती लांडे यांची एसटीपीएफ-३, पांगडी (मूल) येथे बदली करण्यात आली आहे. ब्रह्मपुरी उत्तरचे आरएफओ सचिन नरड यांची सामाजिक वनीकरण, मलकापूर (अकोला) येथे बदली करण्यात आली आहे. श्रीनिवासी गव्हारे यांची ताडोबा बफरच्या धाबा वनपरिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली आहे. ताडोबा कोअरच्या कारवा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद जांभुळे यांची चौडमपल्ली-चपराळा वनपरिक्षेत्रात बदली करण्यात आली असून, संदीप लंगडे यांची जिवती वनपरिक्षेत्रातून नागपूर वनपरिक्षेत्र वर्किंग प्लॅन विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या