Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ.प्रवीण वक्ते व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नियुक्ती (Dr. Pravin Vakte appointed as Pro-Vice-Chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University during the Management Council meeting.)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ.प्रवीण वक्ते व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नियुक्ती (Dr. Pravin Vakte appointed as Pro-Vice-Chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University during the Management Council meeting.)

छत्रपती संभाजीनगर -: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी ’केमिकल टेक्नॉलॉजी’ विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.प्रवीण वक्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरुपद ४ मार्च २०२६ पासून रिक्त होते. या पदाच्या नियुक्तीसाठी व्यवस्थापन परिषदेची तातडीचे बैठक मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१८) दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली. बैठकीस कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सन्मानीय १५ सदस्य प्रत्यक्ष तर चार सदस्य ऑनलाईनरित्या उपस्थित होते. बैठकीत प्रशासनाच्यावतीने पुर्णवेळ प्र कुलगुरुपदासाठीचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आला. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्यासह सर्व सदस्यांनी डॉ.प्रवीण श्रीधरराव वक्ते यांची या पदावर नियुक्ती करण्यास मान्यता दिली. 
         महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१४ कलम १३ (६) अन्वये ही नियुक्ती करण्यात अली. डॉ.प्रवीण वक्ते हे गेल्या २७ वर्षांपासून केमिकल टेक्नॉलॉजी विभागात अध्यापन, संशोधन कार्य करीत आहेत. यापुर्वी ६ ऑगस्ट २०१९ ते २८ ऑक्टोबर २०२० या काळात त्यांनी प्रभारी प्रकुलगुरु म्हणून काम केले आहे. तसेच श्री संतपीठ पैठणचे समन्वयक, ’आयपीआर’ सेलचे संचालक, खरेदी समिती सदस्य, अधिसभा, विद्या परिषद, व्यवस्थापन परिषद सदस्य, परीक्षा मंडळ, सिफार्टचे संचालक, बजाज इन्क्यूबूशनचे संचालक, नवोप्रक्रम मंडळ संचालक, अधिष्ठाता मंडळाचे सदस्य सचिव आदी पदांवर कार्य केले आहे. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते डॉ.वक्ते यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी डॉ.प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण परिषदेचे तज्ज्ञ सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांना पेटंटही प्राप्त असून शहरातील गजानन मंदिर ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. प्र कुलगुरुपदाचा अनुभव डॉ.प्रवीण वक्ते यांनी सुमारे सव्वा वर्षे प्रभारी प्रकुलगुरु म्हणून उत्तम रितीने काम सांभाळले आहे. या काळात महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण (ट्रिपल ए) उत्तम रितीने करण्यात आले. तसेच सध्या ते अधिष्ठाता मंडळाचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. आता मात्र त्यांची पूर्णवेळ प्रकुलगुरु म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे ३२ महिन्यांचा कार्यकाळ त्यांना मिळणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या