चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप, कोलंबियात भारताचे राजदूत म्हणून डॉ. विनोद बहाडे यांची नियुक्ती (A Son of Ballarpur, Chandrapur District, Soars to the International Stage: Dr. Vinod Bahade Appointed as India's Ambassador to Colombia.)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने डॉ. विनोद बहाडे यांची दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव म्हणून दहशतवादविरोधी विभागात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे डॉ. विनोद बहाडे हे मूळ चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावचे आहेत. भारतीय परराष्ट्र सेवेतील 2007 च्या तुकडीतील अधिकारी असलेल्या डॉ. विनोद बहाडे यांनी यापूर्वी हनोई, सिडनी, कैरो आणि वॉशिंग्टन डी.सी. येथील भारतीय दूतावासांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या