वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार 18 जून ला निवडणूक (Election for the Wardha-Chandrapur-Gadchiroli Local Authorities' Constituency: 977 members of local self-government bodies will exercise their right to vote. The election is scheduled for June 18.)
चंद्रपूर :- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक येत्या 18 जून 2026 रोजी होणार आहे. त्यासाठी या तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी येथे पत्रपरिषदेत केले. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीबाबत त्या माहिती देत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, त्याखालोखाल वर्धा जिल्ह्यातील 264, तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांचा समावेश आहे. या निवडणुकीकरीता चंद्रपूर महानगरपालिकेचे 66 सदस्य तसेच जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 7 नगर पंचायतीचे एकूण 403 असे चंद्रपूर जिल्ह्यातील 469 मतदार, गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि 9 नगर पंचायतींचे एकूण 244 मतदार तर वर्धा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांचे एकूण 264 मतदार आहेत. तर चंद्रपूर, गडचिरेाली आणि वर्धा येथील जिल्हा परिषदांच्या सदस्यांची संख्या शुन्य आहे. कारण त्या ठिकाणी सद्यस्थितीत लोकप्रतिनिधी नाहीत. या निवडणुकीकरीता प्रत्येक जिल्ह्यातील उपविभागाच्या मुख्यालयी एक याप्रमाणे 17 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. तसेच मतमोजणी चंद्रपूर जिल्हा स्तरावर करण्यात येणार आहे. या निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे पंत यांनी सांगितले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या