Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

राष्ट्रीय कर्तव्यात कसूर करणाऱ्या व जनगणनेच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या चंद्रपूरातील 17 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल, मनपा प्रशासनाची रामनगर पोलिसांत तक्रार (Cases filed against 17 teachers in Chandrapur for dereliction of national duty and shirking census work; Municipal Corporation administration lodges complaint with Ramnagar Police.)

राष्ट्रीय कर्तव्यात कसूर करणाऱ्या व जनगणनेच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या चंद्रपूरातील 17 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल, मनपा प्रशासनाची रामनगर पोलिसांत तक्रार (Cases filed against 17 teachers in Chandrapur for dereliction of national duty and shirking census work; Municipal Corporation administration lodges complaint with Ramnagar Police.)

चंद्रपूर :- देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जनगणनेच्या राष्ट्रीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या तब्बल 17 शिक्षकांविरुद्ध चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करून प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यामुळे 17 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत 2026-27 ची जनगणना प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या राष्ट्रीय कामासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने विविध विभागातील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, संबंधित 17 कर्मचाऱ्यांनी ही नियुक्ती पत्रे स्वीकारण्यास टाळाटाळ केली आणि प्रशिक्षणाच्या सत्राकडेही पाठ फिरवली. जनगणना अधिनियम 1948 च्या कलम 11 नुसार राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यास नकार देणे हा गुन्हा आहे. वारंवार सूचना देऊनही कामकाजात अक्षमता दाखवणाऱ्या या कर्मचाऱ्यांविरुद्ध अखेर चंद्रपूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त (झोन 3) राहुल पंचबुद्धे यांच्या आदेशानुसार तक्रार दाखल करण्यात आली. रामनगर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 (ए) आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950, 1951 व 1989 च्या कलम 32 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास रामनगरच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके करत आहेत. मनपाचे चार्ज जनगणना अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सचिन मोरेश्र्वर माकोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार किरणकुमार पी. मोहोडे, प्रतिक दातार यांच्यावर तर झोन क्रमांक 3 राहुल पंचबुद्धे यांनी शुक्रवारी दिलेल्या तक्रारीनुसार 17 कर्मचाऱ्यांनी ही नियुक्ती पत्रे स्वीकारण्यास टाळाटाळ केली त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व कर्मचारी विविध तांत्रिक आणि शैक्षणिक पदांवर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे यातील काही कर्मचारी एका प्रतिष्ठित असलेल्या तंत्रनिकेतन चे कर्मचारी असल्याची चर्चा सुरु आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या