12 वी निकाल, शेकडो विद्यार्थ्यावर कारवाईचे वृत्त, मास कॉपी प्रकरणी विदर्भातील दोन जिल्ह्यातील 243 विद्यार्थी अनुत्तीर्ण : बोर्डाचा निर्णय (12th Grade Results: Reports of Action Against Hundreds of Students; 243 Students from Two Vidarbha Districts Fail Due to Mass Copying: Board's Decision)
नागपूर :- राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. मात्र, बारावीच्या परीक्षेदरम्यान तीन पेपर फुटल्याची घटना समोर आली असताना, गोंदिया आणि वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यात ‘जीवशास्त्र’ या पेपरदरम्यान ‘मास कॉपी’ केल्याचे २४३ विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस (Maharashtra HSC mass copying case 2026) आला. याप्रकरणी या सर्वच विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आला आहे. या सर्वच विद्यार्थ्यांवर अनुशासनात्मक कारवाई केल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च यादरम्यान विविध केद्रांवर घेण्यात आली. यावेळी सेंट उर्सुला येथे शिक्षकांच्या समयसुचकतेने विज्ञान विषयातील केमेस्ट्री विषयाचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली. त्यानंतर गणित आणि फिजिक्स पेपरही फुटल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी ट्युशन क्लासेसच्या संचालकांसह जयताळ्यातील एका शाळेच्या संचालक आणि साथीदार अशा आठ जणांना अटक केली होती. त्यामुळे बारावीच्या परीक्षेदरम्यान एकच खळबळ उडाली होती. मात्र, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वाशी गावातील जे.डी.चौधरी कॉलेजमध्ये ११८ विद्यार्थ्यांनी, तर गोंदिया जिल्ह्यातील कातुली येथील माऊली कनिष्ठ महाविद्यालयात १२५ विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र विषयात कॉपी केल्याची पेपर तपासणीत उघड झाले. या विद्यार्थ्यांवर अनुशासनात्मक कारवाई करीत त्यांना अनुत्तीर्ण करण्यात आल्याचे डॉ. पटवे यांनी सांगितले. विभागीय शिक्षण मंडळाकडून जीवशास्त्र विषयाचा पेपर तपासण्यात आल्यावर त्यांना दोन केद्रांवरील २४३ विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये एकसारखे उत्तर लिहिले असल्याची माहिती समोर आली. ही माहिती मॉडरेटरला देण्यात आल्यावर त्यांनी बोर्डाला कळविले. त्यातून चौकशी समिती लावून या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय, त्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या केंद्रावर असलेल्या सर्वच शिक्षकांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच ही केंद्रे तत्काळ रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या