Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

आकाश गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची बारावी परीक्षेत चमकदार कामगिरी, अनुष्का तावाडे गुरुकुल मधून पहिली (Akash Gurukul Students Deliver Stellar Performance in 12th Grade Exams; Anushka Tawade Secures First Place from Gurukul.)

आकाश गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची बारावी परीक्षेत चमकदार कामगिरी, अनुष्का तावाडे गुरुकुल मधून पहिली (Akash Gurukul Students Deliver Stellar Performance in 12th Grade Exams; Anushka Tawade Secures First Place from Gurukul.)


बल्लारपूर : येथील आकाश गुरुकुल कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या कोचिंगमधील विद्यार्थ्यांनी उच्च टक्केवारी मिळवत यशाची बाजी मारली आहे. आकाश गुरुकुलमध्ये मार्गदर्शन घेणारी अनुष्का मनिष तावाडे हिने ८८.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर महाविद्यालयातून दुसरा व तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकावीला.


         तिच्या पाठोपाठ अल्सीफा जहा हुसैन खा हिने ८५.८३ टक्के, श्रेयसी स्वप्नील पांडे हिने ८५.६७ टक्के, वंश देवेंद्र ओहरी याने ८३.८३ टक्के तर सानिया संदीप बेलगीर हिने ८३.०० टक्के गुण मिळवले. तसेच पूजा राकेश झा हिने ८१.८३ टक्के, नैतिक बहुरीया याने ८०.०० टक्के गुण मिळवत उत्तम यश संपादन केले. याशिवाय, आकाश गुरुकुलमधील सुमारे १५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. या यशामागे कोचिंगचे संचालक हर्षल नवघरे यांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची कठोर मेहनत महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांकडून नियमित सराव व अभ्यास करून घेतल्यामुळे हा यशस्वी निकाल लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या