चंद्रपूर -: एकीकडे राज्य सरकार आणि शिक्षण विभाग 'कॉपीमुक्त' परीक्षेचे दावे करत असताना, चंद्रपूर जिल्ह्यातील एका तालुक्यातील शहरातून या दाव्यांच्या चिंधड्या उडवणारा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शहरातील एका नामांकित महाविद्यालयाने परीक्षेच्या नावाखाली बी.ए प्रशासकीय परीक्षेचा पेपर सुरु असतांना चक्क कॉपीचा बाजार मांडल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सदर घटना एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उघडकीस आल्याचं वृत्त आहे नेमके प्रकरण काय? या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यातील महाविद्यालयात परीक्षा सुरू असताना चक्क पैशांची देवाणघेवाण करून विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची मुभा दिली जात आहे. "३०० रुपये द्या आणि मोबाईलवर बिनधास्त कॉपी करा" असा अजब आणि संतापजनक फतवाच जणू येथे राबवला जात आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल सरकारकडून दरवर्षी कॉपीमुक्त अभियानासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, या कॉलेजमधील दृश्यांनी राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सीसीटीव्ही आणि भरारी पथकांच्या निगराणीत परीक्षा घेण्याचे नियम असताना, वर्गामध्ये विद्यार्थी उघडपणे मोबाईल वापरून उत्तरे लिहीत असल्याचे दिसून येत आहे. ३०० रुपयांच्या मोबदल्यात मोबाईलवरून कॉपी करण्याची परवानगी. परिणाम प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि गुणवत्तेचा दर्जा घसरण्याची भीती कारवाईकडे लागले लक्ष एका बाजूला प्रशासन पारदर्शकतेच्या बाता मारत असताना दुसऱ्या बाजूला असा 'खेळखंडोबा' सुरू असल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाची दखल घेऊन शिक्षण विभाग संबंधित कॉलेजवर काय कारवाई करणार आणि या गैरप्रकाराला खतपाणी घालणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या