अवैध सावकारीच्या तगाद्यामुळे रोशन कुडे या शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, आता न्यायासाठी बळीराजाने सरकारकडे इच्छा मरणाच्या परवानगीची मागणी केली (Relentless harassment by illegal moneylenders forced farmer Roshan Kude to sell his kidney; now, seeking justice, the farmer has petitioned the government for permission to undergo euthanasia.)

Vidyanshnewslive
By -
0
अवैध सावकारीच्या तगाद्यामुळे रोशन कुडे या शेतकऱ्याला किडनी विकायला लावली,  आता न्यायासाठी बळीराजाने सरकारकडे इच्छा मरणाच्या परवानगीची मागणी केली (Relentless harassment by illegal moneylenders forced farmer Roshan Kude to sell his kidney; now, seeking justice, the farmer has petitioned the government for permission to undergo euthanasia.)

नागभीड :- चंद्रपूर जिल्ह्याच्या मिंथूर येथील रोशन कुडे यांनी सावकाराच्या जाचामुळे आपली किडनी कंबोडिया येथे विकल्याचे धक्कादायक प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आले होते. त्यानंतर आता रोशन कुडे यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकणारे नागभीड तालुक्यातील शेतकरी रोशन कुडे यांनी सरकारकडे चक्क इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिले होते, मात्र दीड महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप रोशन कुडे यांनी केलाय. त्यांच्या या मागणीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 
           अशातच आता अवैध सावकारांच्या कर्जाच्या विळख्यात अडकून स्वतःची किडनी विकण्याची वेळ आलेल्या रोशन कुडे या शेतकऱ्यानेही अशीच मागणी केली आहे. आजही न्यायासाठी प्रशासनाच्या दारात चकरा माराव्या लागत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिले होते, मात्र दीड महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप रोशन कुडे यांनी केलाय. माझी शेती मला परत मिळालेली नाही, माझं संपूर्ण आयुष्य शेतीवर अवलंबून आहे. चार महिन्यांपासून मी न्यायासाठी फिरतोय, पण कुठेही दखल घेतली जात नाही. त्यामुळे मला लवकरात लवकर मदत करावी अन्यथा मला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी आर्त मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदनं देऊन शासनाकडे केली आहे. कोरोना काळात डबघाईला आलेला दुधाचा व्यवसाय आणि त्यानंतर आलेल्या लंपी आजारामुळे रोशन कुडे सावकाराकडून घेतलेले अवघे एक लाख रुपयांचे कर्ज फेडू शकले नाही. मात्र दुसरीकडे सावकार त्याला पद्धतशीर आपल्या जाळ्यात अडकवत राहिले. व्याजावर व्याज चढवत लाखो रुपयांची रक्कम त्याच्याकडून लाटली आणि अखेर त्याला किडनी विकण्यास भाग पाडलं, अशी व्यथा शिवदास कुडे यांनी मांडली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)