बल्लारपूर :- तथागत बुध्दाच्या शुध्द प्रज्ञेतुन प्राप्त झालेले ज्ञान म्हणजे जगाला सुख-शांती, मानवतेचा व दुःख मुक्तीचा संदेश देणारा मार्ग आहे. सम्राट अशोकांनी बुद्धांच्या धम्माचा जागतीक पातळीवर प्रसार व्हावा म्हणुन धम्मदुत विदेशात पाठविले त्यांनी ८४००० बुदुध विहार बांधले त्यामाध्यमातुन बुद्धाच्या ज्ञानाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला अनेक प्रदेश बुद्ध शासीत झाले. यामध्ये सम्राट अशोकाचा मोठा वाटा होता. भारतीय सविधानाचे शिल्पकार, बोधीसत्व, विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा अभ्यास करुन बुध्दाच्या धम्म निवडला हा धम्म विज्ञानावर आधारीत आहे. मानवजातीला तारणारा धम्म आहे. बुद्धाच्या धम्मात स्वातंत्र्य, समता बंधुता प्रामुख्याने दिसून येते. म्हणूनच बाबासाहेबांनी धर्मातरांची घोषणा केली व नागपुर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली व लाखो अनुयानांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली. बाबासाहेबांनी दिक्षा सोहळ्यात २२ प्रतिज्ञा घेतल्या ह्या प्रतिज्ञा म्हणजे बुद्ध धम्माचा सार आहे. तसेच बाबासाहेबांनी बुद्ध व त्याचा धम्म हा ग्रंथ लिहुन बुद्धाचे विचार जनतेच्या आचरणात आले. जनतेला सुख, शांती, मानवतेचा व दुःख मुक्तीचा मार्ग गवसला.बाबासाहेबांच्या या महान कार्यामुळे बहुजन समाजाला प्रेरणा मिळाली बुद्ध-फुले-शाहू आंबेडकराचे असंख्य अनुयायी तयार झाले. या महामानवाच्या विचाराचा प्रसार व्हावा या साठी बुध्द विहार हे आचार विचाराचे केंद्र बनले. लोक बुध्दविहाराकडे येऊ लागले. शहरात खेड्यापाड्यात नवनविन बुध्द विहाराची निर्मीती होऊ लागले. बुध्द विहाराच्या माध्यमातुन बुध्दाच्या ज्ञानाचा जलद गतीने प्रसार होऊ लागला. हाच दृष्टीकोण ठेऊन आम्ही बौध्द समाज पळसगांव व आपल्या सर्वांच्या सहकार्याने बुध्द विहाराचे बांधकाम पुर्ण केले. तथागत बुध्द विहाराचे लोकार्पन सोहळा आयोजीत केला आहे. सर्व जनतेनी या कार्यक्रमास आपली उपस्थीती दर्शवावी ही आग्रहाची विनंती आहे. कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक ०१ मे २०२६ सकाळी ७.०० वा. ध्वजारोहन भदन्त धम्मघोष मेत्ता (महायेरी) यांचा हस्ते उपस्थीती सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत धम्म रॅल्ली (मिरवनुक) भदन्त धम्मघोष मेत्ता महाथेरो, भदन्त सुभद्र, भदन्त तथागत, श्रमण- गुणवर्धक, श्रमण सिध्दार्थ बोधी, श्रमण आनंद बोधी, श्रमण आलोक व इतर सकाळी १०.०० ते ११.०० वाजेपर्यंत (वरिल सर्व भदन्त चंद्रमणी नॅशनल पार्क, अष्टभुजा वार्ड, रमाबाई नगर, चंद्रपुर) तथागत बुध्द विहाराचे उद्घाटन व बुध्द मुर्तीची स्थापना सकाळी ११.३० ते १२.०० पर्यंत भदन्त धम्मेघोष मेत्ता व त्याचा संच यांच्या हस्ते, बुध्द वंदना परित्राण पाठ होईल दुपारी १.०० ते २.०० वाजेपर्यंत जगाला बुध्दाची गरज यावर भिक्खूसंघाचे मार्गदर्शन होणार आहे
सायंकाळी ४.०० ते ७.०० वाजेपर्यंत भारतीय संविधान व सरकारचे धोरण या विषयावर सखोल मार्गदर्शन असून या कार्यक्रमाला प्रमुख मागदर्शक प्रमुख अतिथी एड. डॉ. सत्यपाल कातकर साहेब, मनोवैज्ञानिक, प्रधानाचार्य तथा लेखक, राजुरा मा. योगेश खसन साहेब, ताणेदार पोलिस स्टेशन, कोठारी मा. धनंजय साळवे साहेब, संवर्ग विकास अधिकारी प.स. बल्लारपूर, प्रा. राजेश ब्राम्हणे, सामाजिक कार्यकर्ते बल्लारपूर, डॉ. भिमराव जिवणे सामाजीक कार्यकर्ता, सौ. संगीता सोयाम, प्रशासक प्रा. प. पळसगांव श्री. नितिन बांउरे, प्रशासक समिती सदस्य, प्रा. प. पळसगाव, श्री. व्यंकटेश बुधलवार, त.मु.स. अध्यक्ष पळस गाव, सौ. मुन्नीताई रोचकर, पो. पाटील पळसगांव, अड. मधुकर कोटनाके साहेब, राजुरा, श्री. विजय उपरे, संचालक बाजार समिती श्री. रामकृष्ण पिपरे, मुख्य सरपंच (मुर्ती), श्री पंढरीनाथ कन्नाके, मुख्याधापक, जि.प. स्कूल पळसगाव श्री. गणेश कोकोडे, ग्रामसेवक पळसगांव, श्री. ईश्वर कोडापे, प्रशासक समीती सदस्य, प्रा.प. पळसगांव श्री. छोटु दुर्योधन, प्रभुती सदस्य ग्रा.प. पळसगाव, सौ. लताबाई शामराव माऊलीकर, प्रशासक समिती सदस्य प्रा.प. पळसगाव सौ. मंदा नामदेव इटनकर, प्रशासक सभीती सदस्य प्रा.प. पळसगांव, सी. स्नेहा खाडे, प्रशासक समीती सदस्य प्रा.प. पळसगांव सी. माधुरी बांउरे, प्रशासक समिती सदस्य ग्रा.प. पळसगाव आभार प्रदर्शन सुत्र संचालक रविद्र दुयोर्धन, अध्यक्ष बौद्ध समाज पळसगांव महादेव शेवकर, प्रशासक सदस्य ग्रा.प. पळसगाव असे आवाहन समस्त बौद्ध समाज, पळसगाव, डॉ. बाबासाहेब चित्र समीती, पळसगाव आम्रपाली महिला बहुउद्देशीय संस्था, पळसगाव
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या