राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या, चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची अहिल्यानगर ला बदली तर आयुष नोपाणी चंद्रपूरचे नवीन पोलीस अधीक्षक (Transfers of Police Superintendents across the state: Chandrapur's Superintendent of Police, Mumakka Sudarshan, has been transferred to Ahilyanagar, while Ayush Nopani becomes the new Superintendent of Police for Chandrapur.)
मुंबई :- राज्यातील पोलीस प्रशासनात मरगळ झटकण्यासाठी गृह विभागाने गुरुवारी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आणि राज्य पोलीस सेवेतील 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये अनेक जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक बदलण्यात आले असून, महत्त्वाच्या शहरांमधील रिक्त पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ च्या शिफारशीनुसार आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम २२न मधील तरतुदींनुसार या बदल्या करण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय के. बन्सल यांची बदली आता राज्य सायबर सुरक्षेच्या अधीक्षकपदी करण्यात आली आहे. तर नाशिक ग्रामीणचे अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि फोर्स वनचे गजानन राजमाने या अनुभवी अधिकाऱ्यांची रवानगी मुंबईच्या पोलीस उपआयुक्तपदी करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणच्या रिक्त जागेवर आता ठाणे ग्रामीणचे अधीक्षक धोडोंपत एस. स्वामी यांची वर्णी लागली आहे. अहिल्यानगरचे अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची पोलीस महासंचालक कार्यालयात सहायक पोलीस महानिरीक्षक म्हणून वर्णी लागली असून, त्यांच्या जागी चंद्रपूरचे मुम्मका सुदर्शन पदभार स्वीकारतील. तर चंद्रपूरचे नवीन पोलीस अधिक्षक म्हणून आयुष नोपाणी असतील परभणीचे अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी आता मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात उपआयुक्त असतील, तर त्यांच्या जागी पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे प्रमुख निकेश खाटमोडे यांची वाशिमच्या अधीक्षकपदी बदली झाली असून, वाशिमचे अनुज मिलिंद तारे आता खाटमोडे यांच्या जागी पुण्यात टास्क फोर्सची सूत्रे हाती घेतील.
पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार बदली झालेल्या 21 अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या नवीन पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
अजय के. बन्सल - पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य
सिंगुरी विशाल आनंद - पोलीस अधीक्षक, धुळे
बाळासाहेब पाटील - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
सोमनाथ घार्गे - सहायक पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक कार्यालय
रविंद्रसिंह एस. परदेशी - उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
संदीप घुगे - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
श्रवण दत्त - स्टाफ ऑफिसर, अपर पोलीस महासंचालक - विशेष कृती
मुम्मका सुदर्शन - पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
धोंडोपंत एस. स्वामी - पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
अनुज मिलिंद तारे - पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
अनुराग जैन - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
अश्विनी सानप - पोलीस अधीक्षक, नंदुरबार
तेगबीर सिंह संधु - पोलीस अधीक्षक, जालना
राजकुमार शिंदे - पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे
निकेश खाटमोडे - पोलीस अधीक्षक, वाशिम
आयुष नोपानी - पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
पंकज कुमावत - पोलीस अधीक्षक, परभणी
निकेतन कदम - पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण
सूरज गुंजाळ - अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव
गजानन राजमाने - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
दत्ता लक्ष्मण तोटेवाड - अपर पोलीस अधीक्षक, अमरावती
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या