बल्लारपूर :- ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य प्रस्तुत राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र साई "पद्मश्री पुरस्कार" हा दिनांक 2 मे 2026 शनिवार. रोजी ठिक सकाळी 9:30. वाजता परिवार लाॅन्स बॅंकेट हाॅल न्यु रिंग रोड सिटी मार्केट शेजारी शिर्डी. अतिशय धुमधडाक्यात व निसर्गाच्या सान्निध्यातील प्रसन्न वातावरणात संपन्न होत आहे या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्याची पुर्ण तयारी झालेली आहे, या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकूण 275 मान्यवरांना हा साई च्या नावाने दिला जाणारा व साईच्याच पदस्पर्शाने या पावन भुमित (शिर्डीत) हा अतिशय मानाचा, सन्मानाचा, प्रतिष्ठेचा व श्रद्धेचा असा हा पुरस्कार प्रमुख अतीथिंच्या हस्ते वितरण करण्यात येत आहे. या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यास राज्यातील सुमारे 1000 ते 1200 लोकांची उपस्थिती राहाणार आहे. तसेच या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यास नामवंत समाज सेवक तसेच प्रसिद्ध उद्योजक तसेच प्रसिद्ध शिक्षण तज्ञ, प्रसिद्ध कृषीविषयक क्षेत्रातील तज्ञ व सिनेमा सृष्टीतील सेलिब्रिटीज च्या शुभ हस्ते व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे. विशेष करून या पुरस्कार सोहळ्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद होणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या