Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूर येथे ज्ञानज्योती अभियान' अंतर्गत २५ एप्रिल रोजी 'भव्य शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळेचे' आयोजन (A 'Grand Educational Guidance Workshop' has been organized at Ballarpur on April 25th, under the 'Dnyanjyoti Abhiyan'.)

बल्लारपूर येथे ज्ञानज्योती अभियान' अंतर्गत २५ एप्रिल रोजी 'भव्य शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळेचे' आयोजन (A 'Grand Educational Guidance Workshop' has been organized at Ballarpur on April 25th, under the 'Dnyanjyoti Abhiyan'.)

विद्यार्थ्यांना करिअर आणि शिष्यवृत्तीबाबत तज्ज्ञांकडून मिळणार मोफत मार्गदर्शन

बल्लारपूर :- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त, त्यांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्यासाठी 'ज्ञानज्योती अभियान' अंतर्गत बल्लारपूर येथे एका विशेष शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता गोंडराजे बल्लाळशाह नाट्यगृह (कला मंदिर जवळ) येथे ही कार्यशाला पार पडेल. 'ज्ञानज्योती अभियान अंतर्गत आम्ही साथी बहुउद्देशीय संस्था' आणि 'स्वयं प्रेरित कार्यकर्ते, बल्लारपूर' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचे उद्घाटन गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय दुधे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या मा. प्रकृती पाटील मॅडम असतील, तर स्वागत अध्यक्ष म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते रोहित चुटे उपस्थित राहतील. या संदर्भात माहिती देण्यासाठी बल्लारपूर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन 22 तारखेला करण्यात आले होते याला प्रमुख उपस्थिती म्हणून बुद्धशील बहादे, मा. प्रकृती पाटील, माजी प्राचार्य, मा. रश्मी बारसागडे, अमोल वर्मा, रवी सर, गौरव वाळके ई ची उपस्थिती होती.
          कार्यशाळेचे मुख्य आकर्षण आणि विषय या कार्यशाळेत प्रामुख्याने १० वी, १२ वी आणि पदवी नंतरच्या विविध करिअर संधींवर प्रकाश टाकला जाणार आहे. यामध्ये प्रवेश परीक्षा मार्गदर्शन CUET, IISER, NEET, JEE आणि MH-CET बाबत सविस्तर माहिती. नामवंत विद्यापीठे JNU, DU, TISS, Jamia, MU आणि पुणे विद्यापीठात प्रवेश घेण्याची प्रक्रिया. मोफत शिक्षण संधी एकलव्य निवासी शाळा आणि इंग्रजी नामांकित शाळांमध्ये मोफत प्रवेशाबाबत मार्गदर्शन. स्पर्धा परीक्षा MPSC, UPSC आणि बँकिंग क्षेत्रातील संधी तसेच पुणे, मुंबई, नाशिक सारख्या शहरात उपलब्ध असलेल्या मोफत क्लासेसची माहिती. आर्थिक मदत ४० हजार रुपयांपर्यंतच्या मानधन योजना आणि विविध शासकीय शिष्यवृत्ती. विशेष म्हणजे तज्ज्ञ मार्गदर्शकांचे लाभणार मार्गदर्शन याप्रसंगी नागपूर येथील नेचर फाऊंडेशनचे संस्थापक मा. निलेश नन्नावरे आणि युरोपियन कमिशनची प्रतिष्ठित इरास्मस मुंडस शिष्यवृत्ती प्राप्त कायदेतज्ज्ञ व सामाजिक न्याय अभ्यासक एडवोकेट बोधी रामटेके हे परदेशातील उच्च शिक्षणासंबंधीच्या संधी याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या